News Flash

Recipe : घरीच अशी तयार करा डाल्गोना कॉफी

आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते.

– शेफ  शाजिल नायर
सध्या आपल्याला संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा दिसते ती डाल्गोना कॉफीची. तर थोडक्यात जाणून घेऊयात या ट्रेंडिंग ड्रिंक्सच्या उत्पत्तीबद्दल; पॅट्रेशिया बी नुसार, जेव्हा“पियुनस्टोरंग” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरियन शोमध्ये हि कॉफी दाखवण्यात आली तेंव्हापासून डालगोना कॉफी प्रसिद्ध झाली. जानेवारी महिन्यात, अभिनेता जंग दुसरा- वू मकाऊला गेला होता आणि त्याला कोरियन पारंपारिक स्पंज कँडी देण्यात आली, त्याने ती सोप्या पद्धतीने पिण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा तिला डाल्गोना असे नाव देण्यात आले. ही स्पंज कँडी पोपगि म्हणून देखील ओळखली जाते.

कॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी.

साहित्य (एका कपासाठी )
२ चमचे कॉफी पावडर
३ चमचे साखर
२ चमचे गरम पाणी
¾ कप थंड दूध
बर्फाचे तुकडे (आवश्यक असल्यास)
पद्धत
१. यासाठी प्रथम एक वाडगा घ्या जो पुरेसा खोल आहे. त्यात कॉफी पावडर, साखर, गरम पाणी घाला आणि नीट ढवळून घ्या. तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हिस्कर असल्यास त्याचाही वापर करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि उर्जा हि वाचेल. ते नसल्यास, जवळजवळ १० मिनिटांसाठी सतत हाताने ढवळत राहा जोपर्यंत फेसाळ आणि जाड पोत मिळत नाही.
२. व्हीप्ड कॉफीचा रंग छान हलका तपकिरी रंगात बदलेल.
३. त्यानंतर एक ग्लास घ्या आणि त्यात ३/४ थंडगार दूध घाला. पेयांची शीतलता टिकविण्यासाठी बर्फाचे तुकडे पर्यायी आहेत.
४. आणि त्या ग्लासमध्ये व्हीप्ड कॉफी ओतून पूर्णपणे भरा. तर अशा पद्धतीने तुमची डालगोना कॉफी सर्व करण्यास तयार झाली. पिण्यापूर्वी तुम्ही कॉफी नीट ढवळून घ्या.

(लेखक एफ अँड बी लेक्चरर आयटीएम आयएचएम आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 2:18 pm

Web Title: recipe how to make dalgona coffee nck 90
Next Stories
1 WhatsApp युजर्सना झटका, मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी आता नवीन मर्यादा
2 COVID-19 : फेसबुकच्या चुकीमुळे युजर्स ‘बॅन’, मागितली माफी
3 चार कॅमेऱ्यांचा शानदार स्मार्टफोन झाला स्वस्त, ‘ही’ आहे नवी किंमत
Just Now!
X