News Flash

Recipe : अशी तयार करा आंब्याची चटणी

जेवायच्या वेळी तोंडी लावण्यासाठी अंब्याच्या चटणीचा वापर केला जातो....

कच्चा आंबा – २५० ग्रॅम

· जिरे – ½ चमचे

· मोहरी – ½ चमचे

· मेथीचे दाणे – ¼ चमचे

· बडीशेप – ½ चमचे

· कलोंजी – ¼ चमचे

· हळद – ¼ चमचे

· लाल मिरची पावडर – 1 चमचे

· कोथिंबीर पावडर – ½ चमचे

· जिरे पूड – ¼ चमचे

· साखर – 4 चमचे

· पाणी – ¼ कप

· तेल – 1 चमचा

· मीठ – चवीनुसार

कृती

१. कच्चा आंबा स्वच्छ धुवून त्याला सोलून घ्या. ते दोन भागांत कापल्यानंतर, आतील कोय काढून टाका आणि लहान- लहान चौकोनी तुकडे करा.

२. पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. जर तुम्हाला मोहरीचे तेल वापरायचे नसेल तर तुम्ही कोणतेही इतर तेल वापरू शकता.

३. मोहरी, जिरे, मेथीचे दाणे, बडीशेप, कलोंजी घालावे, त्यात हळद लाल मिरची पावडर, कोथिंबीर पावडर, जिरेपूड, मीठ घालावे लगेच आंब्याच्या फोडी घालाव्या आणि दोन मिनिटे चांगले मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये गुळ आणि पाणी घालावे.

४. चांगले उकळवा, ते मिश्रण झाकून घ्या आणि अधून मधून हलवत राहा, नंतर बाहेर काढून थंड करा आणि चपाती सोबत सर्व करा.

 

(पाककृती – शेफ सरोज कलन बुडके, वरिष्ठ व्याख्याता, आयटीएम आयएचएम नेरूळ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 5:58 pm

Web Title: recipe of mango lunji
Next Stories
1 Redmi Note 7 Pro चा ‘या’ दिवशी पुन्हा फ्लॅश सेल
2 Holi 2019 : रंगात रंगुनी सारे जाल पण धुळवडी नंतर…
3 फॉलो न करताही मिळवा अपडेट, ट्विटरचे नवे फीचर
Just Now!
X