News Flash

नोकरीच्या शोधात आहात? ही बातमी आहे फक्त तुमच्यासाठी

जाणून घेऊयात कुठे पदभरती निघाली आहे. त्यासाठीच्या अटी काय आहेत. 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशभरात विविध पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. जाणून घेऊयात कुठे पदभरती निघाली आहे. त्यासाठीच्या अटी काय आहेत.

जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER), धन्वंतरी नगर पो.ऑ.,

पुद्दुचेरी – ६०५ ००६ (जाहिरात क्र. Admin/DR/1(2)/2019)

पुढील १०७ ग्रुप-बी/ग्रुप-सी पदांची भरती.

(क) ग्रुप-बी पदे –

(१) नìसग ऑफिसर – ८५ पदे (अजा – ७, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ९, खुला – ४३) (३ पदे ओएच (ओएल) साठी राखीव).

पात्रता – जनरल नìसग अँड मिडवायफरीमधील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण आणि नर्स अँड मिडवाईफसाठीचे रजिस्ट्रेशन.

वयोमर्यादा – २० जानेवारी २०२० रोजी

३५ वष्रेपर्यंत.

वेतन – पे-लेव्हल-७ रु. ४४,९००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ६४,०००/-.

(२) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट – १५ पदे (अजा – ५, अज – ६, इमाव – १,

ईडब्ल्यूएस – २, खुला – १)

(१ पद ओएच (ओएल, ओए) साठी राखीव).

पात्रता – मेडिकल लॅबोरेटरी सायन्समधील पदवी आणि २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. २० जानेवारी २०२० रोजी

३० वष्रेपर्यंत.

वेतन – पे-लेव्हल-६ रु. ३५,४००/- (अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-).

(३) फिजिकल इन्स्ट्रक्टर – १ पद (खुला)\

पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि बी.पी.एड.

इष्ट पात्रता – २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत.

वेतन – पे-लेव्हल-६ रु. ३५,४००/-. अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-.

(४) सायकियाट्रिक नर्स – १ पद (खुला)

(५) ज्युनियर इंजिनीअर (एअर कंडिशिनग) – १

पद (खुला)

(६) इलेक्ट्रॉनिक्स असिस्टंट (वर्कशॉप) –

१ पद (खुला).

ग्रुप-सी पदे –

(७) ईसीजी टेक्निशियन – १ पद (खुला)

(८) यूआरओ टेक्निशियन – १ पद (खुला)

(९) डेंटल मेकॅनिक – १ पद (खुला)

पद क्र. ५ ते ९ साठी पात्रता, कामाचा अनुभव इ. माहिती जाहिरातीत पाहावी.

वयोमर्यादा – पद क्र. १, ३, ५, ७ ते ९ साठी ३० वर्षांपर्यंत. इतर पदांसाठी ३५ वष्रेपर्यंत. कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रे.

ऑनलाइन लेखी परीक्षा दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजी घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज https://www.jipmer.edu.in या संकेतस्थळावर दि. २० जानेवारी २०२० (१६.३० वाजे)पर्यंत करावेत.

’ महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदे भरण्याकरिता अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष भरती मोहीम.

(१) आरोग्य सेवक पुरुष (आरोग्य विभाग)

पात्रता – दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण.

(२) आरोग्य सेवक महिला (आरोग्य विभाग)

पात्रता – साह्य़कारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीस पात्र.

(३) ग्रामसेवक

पात्रता – बारावी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका

(४) शिक्षण सेवक

पात्रता – बारावी (५०% गुणांसह) व डी.एड. व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण.

(५) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

पात्रता – विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह किमान द्वितीय वर्गातील पदवी.

(६) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका.

(७) स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक

पात्रता – दहावी + स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकाचा १ वर्षांचा पाठय़क्रम उत्तीर्ण.

(८) औषध निर्माण अधिकारी

पात्रता – दहावी + फार्मसी डिप्लोमा आणि ५/७ वर्षांचा अनुभव.

(९) पशुधन पर्यवेक्षक

पात्रता – पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन साहाय्यक, साहाय्यक पशुधन विकास अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली पदविका.

(१०) शिक्षण सेवक (माध्यमिक)

पात्रता – संबंधित विषयातील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड.

इत्यादी विविध पदांची भरती होणार आहे. उमेदवारांनी आपल्या जिल्ह्य़ाच्या संकेतस्थळावरील जाहिरात पाहावी. (पात्रता तपासून पाहावी.)

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. ६ जानेवारी, २०२० रोजी ४३ वर्ष.

निवड पद्धती – शिक्षण सेवक पद वगळता इतर पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाईल. दि. ९ जानेवारी २०२० ते १२ जानेवारी २०२० दरम्यान उमेदवारांनी आपण केलेल्या अर्जानुसार परीक्षेचा दिवस पाहून घ्यावा. लेखी परीक्षा एकूण २०० गुणांसाठी कालावधी ९० मिनिटे. (इंग्रजी – १५ प्रश्न, मराठी – १५ प्रश्न, सामान्यज्ञान – १५ प्रश्न, तर्कक्षमता/ अनुमानात्मक चाचणी – १५ प्रश्न, तांत्रिक – ४० प्रश्न, एकूण – १०० प्रश्न) उमेदवारांच्या लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येईल.

शिक्षण सेवक पदासाठी निवड पद्धती – शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (TET) या परीक्षेतील गुणांचा विचार करून गुणवत्ता यादी बनविली जाईल. गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

परीक्षा शुल्क – रु. २५०/- चलनाद्वारे आपल्या जिल्ह्य़ाच्या जाहिरातीत दिलेल्या अधिकाऱ्याचे नावे/खाते क्रमांकावर भरावयाचे आहेत. मूळ चलनाची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (माजी सनिकांना फी माफ आहे.)

काही जिल्ह्य़ांतील रिक्त पदांचा तपशील –

सोलापूर – ४७ पदे (२८ शिक्षण सेवक),

बुलढाणा – ५६ पदे (४४ शिक्षण सेवक),

नागपूर – १६८ पदे (१६० पदे शिक्षण सेवक),

रायगड – १२२ पदे (७७ शिक्षण सेवक),

गडचिरोली – ३९ पदे इ.

अर्जाचा नमुना व लहान कुटुंबाचे प्रतिज्ञालेख जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ६ जानेवारी २०२० (सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत) आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 3:22 pm

Web Title: recruitment deference field in india nck 90
Next Stories
1 आता आली ‘हीरो’ची HF डीलक्स , मिळणार अधिक मायलेज
2 एमआरआय तंत्राने बुद्धिमत्ता पातळीचा अंदाज शक्य, संशोधनात उलघडा
3 खरंच ई-सिगारेटवर कारवाई होतेय का? राज्यांकडून मागवला अहवाल
Just Now!
X