News Flash

लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरींमुळे होते रोग प्रतिकारशक्तीत वाढ!

लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरी ही फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

| September 20, 2013 03:16 am

लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरी ही फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
शास्त्रज्ञांनी एकूण ४४६ विविध रासायनिक संयुगांचा वापर करुन रोग प्रतिकारशक्ती प्रणालीवर होणाऱया परिणामांचे परीक्षण केले. यात लाल द्राक्षांमध्ये आढळणारे ‘रेस्वेराट्रोल’ आणि ब्ल्यूबेरीमधील ‘पेट्रोस्तील्बेने’ ही संयुगे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करत असल्याचे आढळून आले. ही दोन्ही संयुगे  ‘डी’ जीवनसत्वाच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात असे ‘लिनस पौलिंग इंस्टिट्यूट’मधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरी गुणकारी फळे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 3:16 am

Web Title: red grapes and blueberries may boost immunity
Next Stories
1 वाढत्या वयाबरोबर पुरूषांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष!
2 सोशल नेटवर्किंग साईट्सवर ‘राग’ प्रभावशाली!
3 कर्करोग टाळण्यासाठी संत्र्याचा ज्यूस गुणकारी!
Just Now!
X