14 October 2019

News Flash

शाओमीचा बजेट स्मार्टफोन Redmi 7 चा आज सेल, जाणून घ्या ऑफर्स

परवडणाऱ्या किंमतीमुळे हा फोन  ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे

शाओमी कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Redmi 7 हा बजेट स्मार्टफोन लाँच केला होता. भारतीय बाजारात दाखल झाल्यापासून परवडणाऱ्या किंमतीमुळे हा फोन  ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आज भारतात या स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. अॅमेझॉन इंडियाचं संकेतस्थळ आणि  शाओमीचं ऑनलाइन स्टोअर Mi.com वर आज दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल सुरू झालाआहे, याशिवाय एमआय होम स्टोअर्समध्येही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

किंमत आणि ऑफर्स –
रेडमी 7 स्मार्टफोन 2GB रॅम+ 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम+ 32GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 2GB रॅम+ 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आहे. तर, 3GB रॅम+ 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. हा फोन लुनार रेड, कॉमेट ब्ल्यू आणि एक्लिप्स ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबाबत सांगायचं झाल्यास या फोनसाठी कंपनीने रिलायंस जिओसोबत भागीदारी केली असून फोन खरेदी करणाऱ्यांना जिओकडून 4 वर्षांपर्यंत डबल डाटा आणि 2400 रुपये कॅशबॅक मिळेल.

फीचर्स –
Redmi 7 मध्ये Snapdragon 632 प्रोसेसर, 6.26″ HD+ डिस्प्ले, 12MP + 2MP dual rear camera, 8MP selfie camera Corning Gorilla Glass 5, 4000mAh बॅटरी मिळेल. हा फोन Lunar Red, Comet Blue or Eclipse Black या रंगात उपलब्ध होईल. सेल्फी कॅमेऱ्यामध्ये AI ब्युटीफिकेशन आणि AI पोट्रेट मोडचा पर्याय आहे. ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे.
बॅटरी – 4,000 mAh
प्रोसेसर – क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632
Redmi 7 मध्ये युजर्सना IR ब्लास्टर हे फीचर देखील मिळेल. 360° AI फेस अनलॉक
Andriod 9 Pie (MIUI 10)

First Published on May 13, 2019 12:33 pm

Web Title: redmi 7 go on sale in india