27 May 2020

News Flash

दमदार बॅटरी व दर्जेदार कॅमेरा, Redmi 8 आज होणार लाँच

Redmi 8 बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता

Xiaomi कंपनी आज भारतात आपला नवा स्मार्टफोन Redmi 8 लाँच करण्याच्या तयारीत आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. जैन यांनी ट्विटरद्वारे नव्या स्मार्टफोनचा टिझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने 8 मालिकेतील एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन Redmi 8A लाँच केला होता. Redmi 8 बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता असून 7 हजार 999 रुपयांच्या जवळपास याची किंमत असू शकते. हा फोन दमदार बॅटरीसह फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, तसेच यातील कॅमेरा देखील आधीपेक्षा दर्जेदार असेल असं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा- ‘सॅमसंग’चा घडी घालता येणारा Galaxy Fold खरेदी करण्याची संधी

5000mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये असण्याची शक्यता आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप, वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच, फिंगरप्रिंट स्कॅनर असे काही फीचर्स यामध्ये असण्याची शक्यता आहे. प्रोटिक्टिंग कोटिंगसह ग्लॉसी आणि ऑरा मिरर डिझाइनसह हा फोन लाँच केला जाऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 9:15 am

Web Title: redmi 8 india launch know expected price in india specifications sas 89
Next Stories
1 ‘सॅमसंग’चा घडी घालता येणारा Galaxy Fold खरेदी करण्याची संधी
2 BMW M5 Competition भारतात झाली लाँच, किंमत 1.55 कोटी रुपये
3 ‘बेस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या किंमतीत कपात, ‘ही’ आहे नवी किंमत
Just Now!
X