शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 8A dual लाँच केला आहे. हा फोन म्हणजे कंपनीच्या रेडमी 8A ची पुढील आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग यांसारखे फीचर्स मिळतात. हा फोन सी ब्लू, स्काय व्हाइट आणि मिडनाइट ग्रे या तीन नवीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच कंपनीने दोन पावरबँकही लाँच केल्या आहेत.

Redmi 8A dual फीचर्स –
या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22-इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असून 2 जीबी आणि 3 जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये VoWiFi फीचर देखील आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 8A dual मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल. Ai सीन डिटेक्शन आणि Ai पोर्टेट मोड असे फीचर्स कॅमेऱ्यासोबत आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन 18W फास्ट चार्जरसोबत येतो. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही देण्यात आलं आहे.

किंमत –
हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. 2 जीबी रॅम व्हर्जनची किंमत 6 हजार 499 रुपये आणि 3 जीबी रॅम व्हर्जनची किंमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ Mi.com आणि अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावरुन या फोनची विक्री होईल. 18 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

शाओमी पावरबँक –
या स्मार्टफोनशिवाय कंपनीने दोन रेडमी पावरबँकही लाँच केल्या. 10,000mAh आणि 20,000mAh क्षमतेच्या दोन पावरबँक कंपनीने आणल्या आहेत. यात ड्युअल इनपुट आणि ड्युअल आउटपुट सपोर्ट आहे. 10,000mAh क्षमतेच्या पावरबँकमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल, तर 20,000mAh क्षमतेच्या पावरबँकमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. छोट्या पावरबँकची किंमत 799 रुपये, तर मोठ्या पावरबँकची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे.