17 July 2019

News Flash

I Love Mi Sale : Xiaomi च्या स्मार्टफोनवर अॅमेझॉनकडून धमाकेदार सूट; जाणून घ्या ऑफर्स

स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर या ऑफरचा नक्की विचार करा...

डिसेंबर महिना आला की ख्रिसमस आणि वर्षाखेर यामुळे अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करतात. यामध्ये कंपन्या आणि ग्राहक अशा दोघांचाही फायदा असतो. अॅमेझॉनही अशाप्रकारे ऑफर्स जाहीर करण्यात आघाडीवर असते. मान्सून सेल, दिवाळी धमाका यांनंतर आता अॅमेझॉनने आपला आणखी एक खास सेल जाहीर केला आहे. I Love Mi Sale असे या सेलचे नाव असून यामध्ये Mi चे फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. ८ डिसेंबरपर्यंत असणाऱ्या या सेलमध्ये Mi A2 आणि Redmi Y2 वर ३५०० रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळणार आहेत. त्यामुळे Xiaomi Mi A2 हा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेला हा फोन १४,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

तर Redmi Y2 हा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी असलेला फोन ९,९९९ रुपयांना आहे मात्र या या सेलमध्ये तो ८,९९९ रुपयांना म्हणजेच १ हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. तर याच फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला फोन ११,९९९ रुपयांऐवजी १०,९९९ रुपयांना मिळणार आहे. Redmi 6A हा २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असलेल्या फोनवर १ हजारांचे डिस्काऊंट मिळणार असून तो ग्राहकांना ५५९९ रुपयांना मिळणार आहे. तर याच मॉडेलचा २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी असलेला फोन ५०० रुपयांच्या डिस्काऊंटने ६,९९९ रुपयांना मिळणार आहे. याशिवायही रेडमीच्या स्मार्टफोनवर २,२०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय १०० जीबी जास्तीचा डेटाही ग्राहकांना दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनचा हा सेल तुमच्यासाठी नक्कीच चांगला पर्याय ठरु शकतो.

First Published on December 7, 2018 5:10 pm

Web Title: redmi i love mi sale get upto 3500 rs discount and 100gb extra data amazon offer