13 November 2019

News Flash

रेडमी K20 लवकरच लाँच होणार; जाणून घ्या काय आहे विशेष ?

28 मे रोजी हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

रेडमी लवकरच K20 हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर वापरण्यात आला असून सातव्या जनरेशनचा इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. 28 मे रोजी हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीने या मोबाइलचा टिझर लाँच केला असून लवकरच हा फोन भारतीय बाजारपेठेत येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेडमीचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी यापूर्वी यामध्ये छोटा मायक्रो कॅमेरा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनिंगलाही मोठे करण्यात आल्याचे म्हटले होते. नुकतेच K20 आणि K20 Pro या मोबाइला चीनमध्ये 3C सर्टिफिकेट देण्यात आले आहे. दरम्यान K20 मध्ये 18W चे फास्ट चार्जिंग आणि K20 PRO मध्ये 27W चे फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.

यामध्ये 6.39 इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. तसेच यावर गोरील्ला 5 ग्लास देण्यात येणार आहे. तसेच हा फोन रेड, ब्लू, आणि कार्बन कलमध्ये उपलब्ध असेल. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी / 128 जीबी इंटरनल मेमरीमध्ये हा मोबाइल उपलब्ध असेल. तसेच PRO मॉडेल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल मेमरीमध्ये मिळणार आहे. तसेच यामध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला असून मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा देण्यात येणार आहे. तर सेल्फी लव्हर्ससाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात येणार असून 4000 mAh ची बॅटरीही देण्यात येईल. हा मोबाइल अँड्रॉईड पाय वर काम करेल.

First Published on May 24, 2019 5:32 pm

Web Title: redmi k20 seventh generation finger print sensor mobile launch soon