News Flash

Redmi ने आणला टेबिल टेनिसच्या बोर्डऐवढा Smart TV, वाचा किती आहे किंमत?

सिंगल मॅट्रेस बेडपेक्षाही 13.6 टक्क्यांनी अधिक मोठा...

Redmi ने आणला टेबिल टेनिसच्या बोर्डऐवढा Smart TV, वाचा किती आहे किंमत?

Xiaomi ने मंगळवारी Redmi K30 Pro स्मार्टफोनसोबत तब्बल 98 इंचाचा Redmi Smart TV Max लाँच केला. नावावरुनच हे स्पष्ट होतंय की रेडमीच्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये 98 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. जर तुम्हाला 98 इंचाचा हा टीव्ही किती मोठा असेल हे समजत नसेल तर, हा टीव्ही सिंगल मॅट्रेस बेडपेक्षाही 13.6 टक्क्यांनी अधिक मोठा असेल. हा टीव्ही आकाराने टेबल टेनिस बोर्डऐवढा आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
रेडमी स्मार्ट TV मॅक्समध्ये 4K डिस्प्लेसह असून यामध्ये MEMC मोशन कंपन्सेशन, कस्टम 12एनएम आधारित प्रोसेसर आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसारखे फीचर्स आहेत. याशिवाय, कस्टमाइज्ड 12एनएम चिप आणि स्मूथ अॅनिमेशनसाठी MEMC मोशन कंपन्सेशन आहे. हा नवा टीव्ही XioaAI बिल्ट-इन, इंटेलिजेंट होम कंट्रोल सेंटर आणि मोठ्या व्हिडिओ-ऑडिओ रीसोर्ससोबत येतो. 85 टक्के NTSC सोबत 192 डायनॅमिक बॅकलिस्ट झोनही देण्यात आला आहे. यात 12nm प्रोसेसरसह 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असून टीव्ही खरेदी करणाऱ्यांना एक वर्ष फ्री कस्टमर केअर सर्व्हिस दिली जाईल.

किंमत :-
नऊ एप्रिल रोजी Xiaomi Mall आणि Xiaomi Home येथे या टीव्हीसाठी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या हा टीव्ही केवळ चीनमध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत 19,999 युआन (जवळपास 2 लाख 15 हजार 600 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही भारतात कधी लाँच केला जाईल याबाबत मात्र कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 9:56 am

Web Title: redmi launches smart tv max with 98 inch 4k display know price specifications and all other details sas 89
Next Stories
1 भारतीय लष्कर अशा प्रकारे करते हँड सॅनेटायझिंग, सोशल मीडियावर व्हिडओ व्हायरल
2 Coronavirus: खरी मर्दानी! २६३ भारतीय विद्यार्थ्यांना इटलीतून मायदेशी सुखरुप परत घेऊन आली
3 Jio Offer : नव्या युजर्सना फ्री ब्रॉडबँड, 10Mbps स्पीडसह मिळेल ‘डबल डेटा’ही
Just Now!
X