शाओमीची सब-ब्रँड कंपनी Redmi ने भारतात दोन पावरबँक लाँच केल्या आहेत. एका पावरबँकमध्ये 10,000mAh क्षमतेची बॅटरी, तर दुसऱ्या पावरबँकमध्ये 20,000mAh क्षमतेच्या बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. यातील 10,000 10,000mAh मॉडेल 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते, तर 20,000 एमएएच मॉडेल 18 वॅटपर्यंत चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी) 

आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन रंगांचे पर्याय या दोन्ही पावरबँकसाठी आहेत. दोन्ही पावरबँकमध्ये ड्युअल युएसबी टाइप-ए इनपुट पोर्ट, एक माइक्रो-युएसबी पोर्ट आणि एक युएसबी टाइप-सी आउटपुट पोर्टचा समावेश आहे. यामध्ये युजर्सना युएसबी टाइप-ए आणि युएसबी टाइप-सी दोन्ही केबलचा वापर करता येईल. 12-लेयर सर्किट प्रोटेक्शनसह येणारे हे दोन्ही डिव्हाइस टू-वे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. दोन्ही पावरबँक डिझाइनच्या बाबतीत सारख्याच आहेत.

किंमत – रेडमी पावरबँक 10,000mAh मॉडेलची किंमत 799 रुपये, तर 20,000mAh मॉडेलची किंमत 1,499 रुपये आहे. दोन्ही रेडमी पावरबँक 18 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपासून Mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरही पावरबँक खरेदीसाठी उपलब्ध असतील.