Redmi Note 10 Pro हा शाओमी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आज(दि.३१) पुन्हा एकदा ‘फ्लॅश सेल’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दुपारी १२ वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (mi.com) Redmi Note 10 Pro च्या सेलला सुरूवात होत आहे.

‘शाओमी’ कंपनीने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भारतात आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसाठी नवीन Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच केली. कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केलेत. यात रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro) आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हे तीन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, शिवाय कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही मिळतो. जाणून घेऊया ‘रेडमी नोट 10 प्रो’ ची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्सबाबत :-

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
The Shapoorji Palanji Group on Tuesday announced the sale of Gopalpur Port in Odisha to Adani Ports and SEZ for Rs 3350 crore
अदानीं’च्या बंदर-सत्तेचा विस्तार; एसपी समूहाकडून गोपाळपूर बंदराची ३,३५० कोटींना खरेदी

Redmi Note 10 Pro ऑफर :-

अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (mi.com) सेलमध्ये या फोनच्या खरेदीवरव काही आकर्षक ऑफर्सही आहेत.  ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन घेतल्यास 1 हजार रुपये इस्टंटं डिस्काउंट मिळेल. याशिवाय कंपनीकडून जिओ युजर्ससाठी 349 रुपयांच्या रिचार्जवर 3 हजार रुपये कॅशबॅकची ऑफरही आहे. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळेल.

Redmi Note 10 Pro  स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. या फोनमध्ये क्लॉड रिअर कॅमेरा सेटअप असून मेन लेन्स 64 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, तिसरा लेन्स 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथी लेन्स 2 मेगापिक्सल डेफ्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, (IR), USB टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. शिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची बॅटरीही मिळेल, यात चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10 Pro ची किंमत काय?:-

Redmi Note 10 Pro च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि व्हिंटेज ब्राँझ अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध असेल.