02 March 2021

News Flash

शाओमीने चीनच्या आधी भारतात लाँच केला बहुचर्चित Redmi Note 7 Pro

एकाहून एक भन्नाट फीचर आणि किंमत फक्त...

चिनी कंपनी शाओमीने भारतात आपला नवा बहुचर्चित स्मार्टफोन Redmi Note 7 Pro लाँच केला आहे. जगभरात सर्वप्रथम भारतामध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजून हा स्मार्टफोन चीनमध्येही लाँच करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या किंमत 13 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असून फोनमध्ये 6.3 इंच (16 सेंटीमीटर) चा डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूला Aura डिझाइन असून ग्रेडिएंट फिनिशींग देण्यात आली आहे. फोनच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूंना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. याशिवाय शाओमी कंपनीने Redmi Note 7 हा स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. पण भारतात लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला नाही. त्याऐवजी मागील बाजूला 12 आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.

भारतात Redmi Note 7 Pro चा पहिला सेल 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे, तर Redmi Note 7 चा पहिला सेल 6 मार्च रोजी होणार आहे. Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन Mi.com, Mi Home आणि Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Redmi Note 7 Pro तीन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन नेप्ट्यून ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर आहे. 2.5D कर्व्ड ग्लास आहे. स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. Redmi Note सीरिजमध्ये पहिल्यांदाच 128 जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. 4,000 mAh ची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली आहे, ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकते आणि स्टँडबाय मोडवर 14 दिवस ही बॅटरी राहू शकते असा दावा कंपनीचा आहे. फास्ट चार्जिंगसाठी ही बॅटरी क्वॉलकॉम क्विक चार्ज 4 ला सपोर्ट करते.

Redmi Note 7 Pro मध्ये 48MP कॅमेरा –
Redmi Note 7 Pro स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे मागील बाजूला दोन कॅमेरे आहेत. यातील पहिला कॅमेरा 48MP आणि दुसरा कॅमेरा 5MP चा आहे, तर सेल्फीसाठी 13MP चा AI फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Sony IMX 586 सेंसरचा वापर करण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये Typc C Port आणि 3.5mm चा हेडफोन जॅक असून IR ब्लास्टर देखील आहे. याद्वारे तुम्ही स्मार्टफोनचा वापर युनिव्हर्सल रिमोट म्हणून करु शकतात. हा स्मार्टफोन AI फेस अनलॉक या फीचरलाही सपोर्ट करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 4:04 pm

Web Title: redmi note 7 pro launched in india before china
Next Stories
1 होंडाच्या Navi मध्ये आलं नवं फीचर, किंमतीत बदल
2 Redmi Note 7 : आज भारतात होणार लाँच, 48MP कॅमेरा आणि बरंच काही
3 सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन Galaxy M20 चा आज फ्लॅशसेल, जाणून घ्या ऑफर
Just Now!
X