शाओमी कंपनीने आपला लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 7 Pro साठी नवीन व्हेरिअंट लाँच केलं आहे. म्हणजेच या फोनसाठी 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा अजून एक पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी + 128जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्येच उपलब्ध होता. 15 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत असून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत मी स्टोअरवरून खरेदी करता येईल. यातील अन्य फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच आहेत. 3 जुलै अर्थात आज दुपारी 12 वाजेपासून या स्मार्टफोनसाठी विक्री (सेल) सुरू झाली आहे.

सेलमध्ये मिळणार या ऑफर-
रेडमी नोट ७ प्रोच्या ४जीबी रॅम+६४जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आणि ६जीबी+१२८जीबी असलेल्या व्हेरिअंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर या फोनच्या खरेदीवर तुम्हाला ११२० जीबी पर्यंत डेटा मोफत मिळेल. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि Airtel Thanks ची ऑफर देखील त्यांना लागू होईल. तसंच रिलायंस जिओनेही या फोनच्या खरेदीसाठी ऑफर जारी केली असून 198 रुपये अथवा याच्या वरील कोणतंही रिचार्ज केल्यास डबल डेटा मिळेल.

भारतात २८ फेब्रुवारी रोजी हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले होते. लाँचच्या एका आठवड्यानंतर ‘रेडमी नोट ७’ ची आणि १३ मार्चपासून ‘नोट ७ प्रो’ ची सुरुवात करण्यात आली होती. भारतात या फोनची विक्री सुरू झाल्यापासून केवळ एका महिन्यात १० लाखांहून अधिक रेडमी नोट ७ प्रो आणि रेडमी नोट ७ या फोनची विक्री झाली होती.

फीचर्स-

– ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
– क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर
– ३ जीबी/४जीबी/६जीबी रॅममध्ये उपलब्ध
– स्टोरेज: यात ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय
– मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
– फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमरा सेटअप
– मागील बाजूस ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
– सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा
– ३.३ एमएम ऑडियो जॅक