शाओमीच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोनपैकी एक Redmi Note 7 Pro च्या किंमतीत कंपनीकडून कपात करण्यात आली आहेय. ‘बेस्ट सेलिंग स्मार्टफोन’मध्ये समावेश असलेल्या या फोनची किंमत दोन हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आयडीसीच्या रिपोर्टनुसार, रेडमी नोट 7 प्रो हा फोन 2019 मध्ये सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर हा स्मार्टफोन नव्या किंमतीसह उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टकडून  या फोनच्या खरेदीवर एक वर्षाची ब्रँड वॉरंटीही दिली जात आहे.  या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 6.3 इंच (16 सेंटीमीटर) चा डॉट नॉच डिस्प्लेही देण्यात आला आहे.

नवीन किंमत –

रेडमी नोट ७ प्रो 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 11 हजार 999 रुपये करण्यात आली आहे. लाँच झाल्यापासून याची किंमत 13 हजार 999 रुपये इतकी होती.

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रुपये झाली आहे. लाँच करतेवेळी याची किंमत 16 हजार 999 रुपये होती.

फोनच्या मागील बाजूला Aura डिझाइन असून ग्रेडिएंट फिनिशींग देण्यात आली आहे. फोनच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूंना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे.  Redmi Note 7 Pro तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन नेप्ट्यून ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर आहे. 2.5D कर्व्ड ग्लास आहे. स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. Redmi Note सीरिजमध्ये पहिल्यांदाच 128 जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. 4,000 mAh ची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली आहे, ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकते आणि स्टँडबाय मोडवर 14 दिवस ही बॅटरी राहू शकते असा दावा कंपनीचा आहे. फास्ट चार्जिंगसाठी ही बॅटरी क्वॉलकॉम क्विक चार्ज 4 ला सपोर्ट करते.

आणखी वाचा : ‘अ‍ॅपल’वर ‘Sign in with Apple’ फीचर चोरल्याचा आरोप

Redmi Note 7 Pro मध्ये 48MP कॅमेरा –
Redmi Note 7 Pro स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे मागील बाजूला दोन कॅमेरे आहेत. यातील पहिला कॅमेरा 48MP आणि दुसरा कॅमेरा 5MP चा आहे, तर सेल्फीसाठी 13MP चा AI फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Sony IMX 586 सेंसरचा वापर करण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये Typc C Port आणि 3.5mm चा हेडफोन जॅक असून IR ब्लास्टर देखील आहे. याद्वारे तुम्ही स्मार्टफोनचा वापर युनिव्हर्सल रिमोट म्हणून करु शकतात. हा स्मार्टफोन AI फेस अनलॉक या फीचरलाही सपोर्ट करतो.