शाओमीने (Xiaomi) सोमवारी आपला नवा मोबाइल Redmi Note 7S लॉन्च केला असून हा मोबाइल Redmi Note 7 ची जागा घेणार असल्याची माहिती आहे. शाओमी तीन महिन्यातच Redmi Note 7 स्मार्टफोन बंद करण्याची योजना आखत आहे. शाओमीने स्वत: यासंबंधी खुलासा केला आहे. शाओमीने दुजोरा देताना सांगितलं आहे की, आगामी दिवसांत Redmi Note 7 स्मार्टफोन बंद करण्यात येणार आहे. शाआमोने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 लॉन्च केले होते.

शाओमीच्या प्रोडक्ट पीआरने ट्विटरवर Redmi Note 7 बंद करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, Redmi Note 7S स्मार्टफोन Redmi Note 7 ची जागा घेणार आहे. मात्र कंपनीने स्मार्टफोनची विक्री कधीपासून बंद करण्यात येणार आहे यासंबंधी खुलासा केलेला नाही. शाओमीच्या या निर्णयाने नुकतीच Redmi Note 7 ची खरेदी करणारे ग्राहक नाराज होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कंपनीने Redmi Note 7 बंद करण्याचं कारण सांगितलेलं नाही. याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे ४८ मेगापिक्सल कॅमेरा सोडल्यास Redmi Note 7S आणि Redmi Note 7 मधील सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच आहेत.

Redmi Note 7S मध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले आणि रिअर पॅनल गोरिल्ला ग्लास ५ च्या कोटिंगने सुरक्षित आहे. याव्यतिरिक्त त्यामध्ये ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर आणि ४००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये दोन रेअर कॅमेरे देण्यात आले असून यातील एक सेंसर 48 मेगापिक्सेलचा आहे. दरम्यान, या Redmi Note 7S चे स्पेसिफिकेशन चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Redmi Note 7 सारखेच आहेत.

Redmi Note 7S मध्ये अॅन्ड्रॉईड ‘पाय’ वर आधारित MIUI 10 देण्यात आले आले. तसेच यामध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस 19.5:9 या आस्पेक्ट रेशोचा एलटीपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निग गोरिल्ला ग्लास 5 आणि 2.5 D कर्व्ह ग्लासचा वापर केला आहे. हा मोबाइल ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. Redmi Note 7S स्मार्टफोन Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.