शाओमीचा Redmi Note 7S अखेर भारतात लॉन्च करण्यात आला. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 pro हे मोबाइल लॉन्च करण्यात आले होते. Mi स्टोअर, Mi.com आणि फ्लिपकार्टवर 23 मे पासून या मोबाइलची विक्री सुरू होणार आहे.

Redmi Note 7S मध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त त्यामध्ये ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आणि 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये दोन रेअर कॅमेरे देण्यात आले असून यातील एक सेंसर 48 मेगापिक्सेलचा आहे. दरम्यान, या Redmi Note 7S चे स्पेसिफिकेशन चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Redmi Note 7 सारखेच आहेत.

Redmi Note 7S ते 3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10,999 ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेले व्हेरिअंटची किंमत 12,999 निश्चित करण्यात आली आहे. ऑनिक्स ब्लॅक, रूबी रेड आणि सफायर ब्लू या रंगांमध्ये हा मोबाईल उपलब्ध असेल. Redmi Note 7 सिरिजमधील हा तिसरा मोबाइल आहे.

Redmi Note 7S मध्ये अॅन्ड्रॉईड ‘पाय’ वर आधारित MIUI 10 देण्यात आले आले. तसेच यामध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस 19.5:9 या आस्पेक्ट रेशोचा एलटीपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निग गोरिल्ला ग्लास 5 आणि 2.5 D कर्व्ह ग्लासचा वापर केला आहे. या मोबाइल 3/32 आणि 4/64 जीबी या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल.