शाओमी कंपनीने आपला भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन रेडमी नोट 8 च्या किंमतीत वाढ केली आहे. रेडमी नोट 8 (4GB रॅम + 64GB स्टोरेज) व्हेरिअंटची किंमत 10 हजार 499 रुपये झाली आहे. अशाप्रकारे या फोनच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर, रेडमी नोट 8 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) अद्यापही 12 हजार 999 रुपयांमध्येच उपलब्ध आहे. रेडमी नोट 8 हा फोन कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केला होता.

‘जीवघेण्या Coronavirus ने चीनमध्ये थैमान घातल्यामुळे फोनच्या ‘सप्लाय चेन’वर परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीला फोनच्या किंमतीत पाचशे रुपयांची वाढ करावी लागली’, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ‘काही कालावधीसाठीच किंमत वाढवण्यात आली आहे, लवकरच जुनी किंमत पुन्हा लागू होईल’, असंही कंपनीने म्हटलंय.

आणखी वाचा –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी) 

आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

Redmi Note 8 –
या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील बाजूला एकूण चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल, तर अन्य कॅमेरे 8 मेगापिक्सल, दोन-दोन मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बॅक पॅनलला आहे.

स्पेसिफिकेशन्स Redmi Note 8 –
– डिस्प्ले – 6.39 इंचाचा डिस्प्ले (1080×2280 पिक्सल रेझोल्युशन)
– प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
– ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड 9 पाय बेस्ड MIUI 10
– बॅटरी – फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरी