शाओमीचा 64 मेगापिक्सल क्षमतेचा दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 8 Pro आज (दि.26) पुन्हा एकदा खरेदी करण्याची संधी आहे. या फोनच्या विक्रीसाठी आज  शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून या सेलला सुरूवात झालीये.

सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही ऑफर्सदेखील आहेत. अ‍ॅक्सिस किंवा आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय, एअरटेल ग्राहक 249 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये डबल डेटा बेनिफिट आणि नो-कॉस्ट EMI चा पर्यायही आहे.

शाओमीने तीन महिन्यापूर्वी भारतात रेडमी नोट 8 सीरिज अंतर्गत रेडमी नोट 8 (Redmi Note 8) आणि रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) हे दोन फोन कंपनीने लाँच केले होते. या सीरिजच्या फोन्सची आतापर्यंत 1 कोटीहून अधिक विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. नोट 8 सीरिजला भारतात उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं कंपनीने सांगितलं.

Redmi Note 8 Pro फीचर्स :
या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा 5 पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा – ड्युअल कॅमेरा + 5,000 mAh ची दमदार बॅटरी, परवडणाऱ्या किंमतीत Vivo Y11 झाला लाँच

किंमत :
6GB रॅम + 64GB स्टोरेज – 14 हजार 999 रुपये,
6GB RAM + 128GB स्टोरेज – 15 हजार 999 रुपये
8GB RAM + 128GB स्टोरेज – 17 हजार 999 रुपये