30 May 2020

News Flash

64MP कॅमेरा! ‘रेडमी नोट 8 प्रो’खरेदी करण्याची पुन्हा संधी

आतापर्यंतच्या सर्व सेलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्याने काही मिनिटांमध्येच हा फोन ‘आउट ऑफ स्टॉक’ होतोय

शाओमीने गेल्या महिन्यातच आपला बहुप्रतिक्षित नवा स्मार्टफोन रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro)भारतात लाँच केला. या फोनच्या विक्रीसाठी शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्याची अजून एक संधी ग्राहकांना आहे. गेल्या महिन्यात लाँच झाल्यापासून हा फोन केवळ फ्लॅश सेलमध्येच खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. तसंच, आतापर्यंतच्या सर्व सेलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्याने काही मिनिटांमध्येच हा फोन ‘आउट ऑफ स्टॉक’ होतोय. दुपारी १२ वाजेपासून हा सेल सुरू होईल. सेलमध्ये एअरटेलच्या ग्राहकांसाठी खास ऑफर असून 249 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 10 महीन्यांपर्यंत डबल डेटा बेनिफिट मिळेल.

Redmi Note 8 Pro फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हेलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा ५ पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या फोनच्या विक्रीसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे.

आणखी वाचा- 108 MP + पाच रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, Xiaomi Mi CC9 Pro झाला लाँच

किंमत –
6GB रॅम + 64GB स्टोरेज – १४ हजार ९९९ रुपये,
6GB RAM + 128GB स्टोरेज – १५ हजार ९९९ रुपये
8GB RAM + 128GB स्टोरेज – १७ हजार ९९९ रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 10:40 am

Web Title: redmi note 8 pro to go on sale know offers price and all specifications sas 89
Next Stories
1 Video: आचारसंहिता संपल्यावर उघडले वाईन शॉप आणि त्यानंतर काय झाले पाहा
2 108 MP + पाच रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, Xiaomi Mi CC9 Pro झाला लाँच
3 तात्काळ मिळणार PAN कार्ड, आयकर विभागाची नवी सेवा
Just Now!
X