शाओमी कंपनीचे Redmi Note 8 आणि Redmi 8 हे दोन स्मार्टफोन आज पुन्हा खरेदी करण्याची संधी असून फोनच्या विक्रीसाठी दुपारी 12 वाजेपासून सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. रेडमी नोट 8 साठी अॅमझॉन इंडिया, mi.com या संकेतस्थळांवर सेल आहे, तर रेडमी 8 हा फोन फ्लिपकार्टसह mi.com वर सेलचं आयोजन करण्यात आलंय. याशिवाय हे दोन्ही फोन mi होम स्टोर्सद्वारेही खरेदी करता येतील.

रेडमी 8 डिस्प्ले फीचर्स, किंमत आणि ऑफर :
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. पण हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून एका विशेष ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. रेडमी 8 खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 लाख ग्राहकांना 7 हजार 999 रुपयांमध्ये 4 जीबी रॅम व्हेरिअंट दिलं जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. यात तुम्ही ड्युअल सीमकार्डशिवाय मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकतात. सफायर ब्ल्यू , रुबी रेड, एमेरल ग्रीन आणि ऑनिक्स ब्लॅक अशा चार रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल Sony IMX363 प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल Portrait लेंस देखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात गुगल लेंस फीचर आहे. 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी यामध्ये असून 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

आणखी वाचा- होलपंच डिस्प्ले, 48MP कॅमेरा! Vivo V17 भारतात लाँच

Redmi Note 8 –
या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील बाजूला एकूण चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल, तर अन्य कॅमेरे 8 मेगापिक्सल, दोन-दोन मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बॅक पॅनलला आहे. रेडमी नोट 8 दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून याच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आणि 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स Redmi Note 8  –
– डिस्प्ले – 6.39 इंचाचा डिस्प्ले (1080×2280 पिक्सल रेझोल्युशन)
– प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
– ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड 9 पाय बेस्ड MIUI 10
– बॅटरी – फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरी