शाओमी (Xiaomi)कंपनीने आपल्या तीन बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. कंपनीने Redmi 8A Dual, Redmi 8, आणि Redmi Note 8 या तीन स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत.

फोनच्या नवीन किंमती कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केल्या आहेत. दीड महिन्यात दुसऱ्यांदा कंपनीने आपल्या फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. यापूर्वी एक एप्रिलपासून नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर कंपनीने आपल्या जवळपास सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या होत्या.

नवीन किंमत :-
कंपनीने Redmi Note 8 च्या किंमतीत 500 रुपयांची, तर Redmi 8A Dual च्या किंमतीत 300 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता रेडमी नोट 8 च्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 10,999 रुपये होती. तर, 6 जीबी रॅम मॉडेलची किंमत 13,999 रुपये झाली आहे.

याशिवाय, रेडमी 8A Dual या स्मार्टफोनच्या 2GB + 32GB मॉडेलची किंमत आता 7,299 रुपये झालीये. आधी या फोनची किंमत 6,999 रुपये होती. तर, 3 जीबी रॅम व्हेरिअंटसाठी आता तुम्हाला 7,999 रुपये द्यावे लागतील. तसेच,  रेडमी 8 या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत आता 9,299 रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत 8,999 रुपये होती.

यापूर्वी एक एप्रिल रोजी स्मार्टफोन्सवर जीएसटी वाढवण्यात आला, त्यावेळी कंपनीने आपल्या जवळपास सर्व प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यामध्ये या तीन फोनचाही समावेश होता. तेव्हा कंपनीने रेडमी नोट 8 च्या किंमतीत 500 रुपये, रेडमी 8 च्या किंमतीत 1000 रुपये आणि रेडमी 8A Dual च्या 2 जीबी मॉडेलच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या तीन फोनच्या किंमतीत वाढ केली आहे.