Xiaomi कंपनीचे दोन दमदार स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max आज (दि. 1) खरेदी करण्याची संधी आहे. दुपारी 12 वाजेपासून दोन्ही स्मार्टफोनसाठी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर सेल सुरू होत आहे.  जाणून घेऊया दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स :

48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अनेक फीचर्स आहेत.  या फोनमध्ये मागील बाजूला 48MP प्रायमरी सेन्सरसह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्सप्रमाणे या फोनमध्येही NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स स्पेसिफिकेशन्स :

भारतात रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला असून 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 64 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

रेडमी नोट 9 प्रो किंमत :

रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स किंमत :-

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.