30 November 2020

News Flash

आता ‘पॉवरफुल’ रॅमसह खरेदी करा Redmi Note 9 Pro Max, किंमत किती?

टॉप व्हेरिअंटची भारतात पहिल्यांदाच विक्री

(PC - Redmi India )

Xiaomi ने आपल्या रेडमी नोट सीरिजमध्ये भारतात तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात Redmi Note 9, Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यातील Redmi Note 9 Pro Max हा फोन कंपनीने भारतात अजून एका व्हेरिअंटमध्ये आणला आहे. आतापर्यंत हा फोन 6GB रॅम क्षमतेसह खरेदीसाठी उपलब्ध होता. भारतात अद्याप फोनच्या टॉप व्हेरिअंटची विक्री झाली नव्हती. पण आजपासून(दि.29) पहिल्यांदा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची विक्री भारतात सुरू होत आहे. यासाठी दुपारी 12 वाजेपासून mi.com या वेबसाइटवर ‘फ्लॅश सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर या फोनसाठी सेल नसेल. त्यामुळे ग्राहक फक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुनहा नवीन व्हेरिअंटमधील Redmi Note 9 Pro Max खरेदी करु शकतात.

फीचर्स :-
रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 64 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

किंमत :-
6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 11:38 am

Web Title: redmi note 9 pro max 8gb ram variant goes on first sale in india check price and other details sas 89
Next Stories
1 Tata Sky ची ‘डबल धमाका’ ऑफर, ‘या’ सहा सेवांच्या किंमतीत झाली 50% कपात
2 फक्त 90 मिनिटांत सामानाची होम डिलिव्हरी, फ्लिपकार्टने आणली नवीन Flipkart Quick सर्व्हिस
3 आठ हजारांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Realme च्या स्वस्त स्मार्टफोनवर शानदार ऑफर
Just Now!
X