‘शाओमी’चा रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन काल(दि.१२) पहिल्यांदाच भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. दुपारी १२ वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन आणि mi.com या संकेतस्थळांवर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतातील पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाला. दुपारी १२ वाजता सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला. शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरद्वारे हा फोन काही मिनिटांमध्येच आउट ऑफ स्टॉक झाल्याची माहिती दिली.

यापूर्वी 24 मार्च रोजी या फोनसाठी सेल आयोजित करण्यात आला होता, पण लॉकडाउनमुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर काल(दि.१२) हा फोन पहिल्यांदा सेलमध्ये उपलपब्ध करण्यात आला. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ई-कॉमर्स कंपन्यांना काही ठिकाणी सूट दिली आहे. त्यानुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या प्रत्येक शहरात या फोनची विक्री करण्यात येणार आहे.

फीचर्स :-
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

किंमत :-
जीएसटी दरांमध्ये वाढ झाल्याने रेडमी नोट 9 प्रो मॅक्सच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.