रेडमी नोट 9 प्रो मॅक्स या स्मार्टफोननंतर आता शाओमीचा शानदार बजेट स्मार्टफोन Redmi Note 9 Pro हा खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी आहे. या फोनच्या विक्रीसाठी आज(दि.14) कंपनीने खास सेलचं आयोजन केलं आहे. Redmi Note 9 Pro च्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्सही आहेत. हा फोन सर्वप्रथम 17 मार्च रोजी पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. तेव्हा पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि दुपारी 12 वाजता सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या 90 सेकंदांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्याचा दावा कंपनीने केला होता. या फोनमध्ये मागील बाजूला 48MP प्रायमरी सेन्सरसह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

सेल  आणि ऑफर :-
Redmi Note 9 Pro भारतीय बाजारात आज दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये उपलब्ध असेल. Mi.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर हा सेल सुरू होत असून या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्सही आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास एक हजार रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय दोन्ही संकेतस्थळांवर इएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.  केंद्र सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ई-कॉमर्स कंपन्यांना काही ठिकाणी सूट दिली आहे. त्यानुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या प्रत्येक शहरात या फोनची विक्री करण्यात येणार आहे.

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्सप्रमाणे या फोनमध्येही NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.