04 August 2020

News Flash

Redmi Note 9 चा आज पहिलाच ‘सेल’, किंमत 11 हजार 999 रुपये

चार दिवसांपूर्वीच कंपनीने लाँच केलाय हा ‘नोट-9’ सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन

रेडमीने आपल्या ‘नोट-9’ सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 9  चार दिवसांपूर्वीच भारतात लाँच केला. ‘नोट-9’ सीरिजमधील Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन स्मार्टफोन कंपनीने यापूर्वीच भारतीय बाजारात आणले होते. आता Redmi Note 9 हा या सीरिजमधला तिसरा स्मार्टफोन ठरला आहे. आधीच्या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत Redmi Note 9 हा स्मार्टफोन स्वस्त आहे. आज भारतात या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलचं आयोदन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com च्या वेबसाइटवर सेलला सुरूवात होईल.

कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये Redmi Note 9 हा फोन एप्रिल महिन्यातच लाँच केला होता. पण ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम या दोनच पर्यायांमध्ये आला आहे. पण, भारतीय बाजारात हा फोन अपेक्षेप्रमाणे 6 जीबी रॅमच्या पर्यायासह आला आहे. कंपनीने नवीन Redmi Note 9 हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये आणलाय. मागील बाजूला चार रिअर कॅमेऱ्यांच्या सेटअपसह होल-पंच डिझाइन असलेला हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये भारतीय बाजारात आला आहे. अ‍ॅक्वा ग्रीन, आर्क्टिक व्हाइट आणि पेबल ग्रे अशा तीन कलरचे पर्याय या फोनसाठी आहेत.

Redmi Note 9 स्पेसिफिकेशन्स:-
ड्युअल-सिम रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. यात 6.53 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) आयपीएस डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर फीचर असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेस असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय मिळतील. आवश्यकता असल्यास माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह Redmi Note 9 मध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस यांसारख्या फीचर्सता समावेश आहे.

किंमत:-
Redmi Note 9 (4GB रॅम + 64GB स्टोरेज) –  11 हजार 999 रुपये

Redmi Note 9 (4GB रॅम + 128GB स्टोरेज) – 13हजार 999 रुपये

Redmi Note 9 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) – 14 हजार 999 रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 10:09 am

Web Title: redmi note 9 to go on its first sale in india get price specifications and other details sas 89
Next Stories
1 रिअलमीच्या नवीन फोनमध्ये होते Ban झालेले चिनी अ‍ॅप्स, कंपनीचे सीईओ म्हणतात…
2 Airtel ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर फ्री मिळेल 6GB पर्यंत डेटा
3 केसांच्या सौंदर्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत सोयाबीन खाण्याचे १० फायदे
Just Now!
X