शिओमी मागच्या काही दिवसांपासून भारतात आपली नवनवीन उत्पादने दाखल करत आहे. कंपनीने नुकताच आपला Redmi Y2 हा फोन लाँच केला असून आता त्यावर एक खास सेलही जाहीर केला आहे. हा सेल आजच्या दिवसापुरता असून यामध्ये ग्राहकांना आकर्षक अशी कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. हा सेल http://www.amazon.com आणि http://www.mi.com वर आहे. काही वेळापूर्वी हा सेल सुरु झाला असून तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Redmi Y2 मोबाईलच्या २ व्हेरिएंटसाठी एअरटेलकडून १८०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. एअरटेलच्या प्रीपेड युजर्सना ही ऑफर मिळेल. यामध्ये ग्राहकांना ५० रुपयांचे ३६ कूपन मिळतील. १९९ आणि ४४८ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांना ही कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एअरटेलच्या मोबाईल अॅपवरुन रिचार्ज करावे लागेल. सध्या शिओमी कंपनीच्या फोनला बाजारात चांगलीच मागणी असून नव्याने आलेल्या या फोनलाही ग्राहकांनी काही दिवसांतच पसंती दिली होती.

Xiaomi Redmi Y2 या फोनची ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत भारतात ९,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. गडद राखाडी, गोल्ड आणि रोज गोल्ड या रंगात हा फोन उपलब्ध आहे. फोन लाँच करतानाच आपण ग्राहकांना काही ऑफर देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठीही लाईट देण्यात आला आहे. यात Red Mi Note 5 प्रमाणे ऑटो एचडीआर मोड देण्यात आला आहे. फोनला १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे २ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनला स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनची मेमरी ३२ आणि ६४ जीबीवरुन २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. ३०८० मिलिअॅम्पियर्सची बॅटरीही देण्यात आली आहे.