शाओमी कंपनीचा ‘सुपर सेल्फी फोन’ अशी ओळख असलेला ‘रेडमी वाय 3’ हा स्मार्टफोन आता ‘ओपन सेल’मध्ये उपलब्ध असणार आहे. आज मध्यरात्री 12 वाजेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन केवळ फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध होत होता. त्यामुळे ग्राहकांना या फोनसाठी सेल केव्हा आयोजित होणार याची वाट पाहावी लागत होती, पण आता ओपन सेलमध्ये उपलब्ध झाल्यामुळे हा फोन ग्राहक केव्हाही खरेदी करु शकणार आहेत. 9,999 रुपये इतकी बेसिक किंमत असलेला हा स्मार्टफोन आता अॅमेझॉन आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल.

हा स्मार्टफोन 3GB रॅम+ 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम+ 64GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. 3GB रॅम+ 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 4GB रॅम+ 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.
या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा आहे.

फोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप –
32MP च्या सुपर सेल्फी कॅमेऱ्यामध्ये ऑटो HDR आहे. या कॅमेऱ्याद्वारे फुल HD सेल्फी व्हीडिओ रेकॉर्डिंग करता येणं शक्य आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये 360° AI फेस अनलॉक असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. तसंच यामध्ये Google Lens चा पर्याय देखील उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये इंफ्रारेड ब्लास्टर फीचर देखील देण्यात आलं आहे.

2 दिवस बॅटरी लाइफ –
Redmi Y3 मध्ये डॉट नॉच डिझाइनसह 6.26 इंच (15.9 सेंटीमीटर) चा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह देण्यात आला आहे. बोल्ड रेड, एलिगंट ब्ल्यू आणि प्राइम ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. फोनच्या मागील बाजूला Aura Prism डिझाइन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत बॅटरी टिकू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आहे.