News Flash

32MP सुपर सेल्फी कॅमेरा, Redmi Y3 चा आज पहिला सेल; मिळणार 1120 GB डेटा

ग्राहकांना मिळणार 1120 जीबी 4जी डेटा

शाओमी कंपनीचा सुपर सेल्फी फोन अशी ओळख असलेल्या ‘रेडमी वाय 3’ या स्मार्टफोनसाठी आज भारतात पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉन, Mi.com आणि शाओमीच्या होम स्टोअर्सद्वारे हा फोन खरेदी करता येणार आहे. यासोबत ‘रेडमी वाय ३’च्या खरेदीवर एअरटेल कंपनीने धमाकेदार ऑफर दिली आहे. ग्राहकांना 1120 जीबी 4जी डेटा एअरटेल देणार आहे.

हा स्मार्टफोन 3GB रॅम+ 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम+ 64GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. 3GB रॅम+ 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 4GB रॅम+ 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.
या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा आहे.

फोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप –
32MP च्या सुपर सेल्फी कॅमेऱ्यामध्ये ऑटो HDR आहे. या कॅमेऱ्याद्वारे फुल HD सेल्फी व्हीडिओ रेकॉर्डिंग करता येणं शक्य आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये 360° AI फेस अनलॉक असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. तसंच यामध्ये Google Lens चा पर्याय देखील उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये इंफ्रारेड ब्लास्टर फीचर देखील देण्यात आलं आहे.

2 दिवस बॅटरी लाइफ –
Redmi Y3 मध्ये डॉट नॉच डिझाइनसह 6.26 इंच (15.9 सेंटीमीटर) चा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह देण्यात आला आहे. बोल्ड रेड, एलिगंट ब्ल्यू आणि प्राइम ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. फोनच्या मागील बाजूला Aura Prism डिझाइन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत बॅटरी टिकू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 10:27 am

Web Title: redmi y3 super selfie camera phone first sale
Next Stories
1 मोठी स्क्रीन आणि पावरफुल बॅटरी, Samsung Galaxy M30 चा आज सेल
2 ‘गुगल’चा पुढाकार! ऑफिसमधील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीसाठी नवी वेबसाइट
3 उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात
Just Now!
X