21 November 2019

News Flash

इजा होण्याच्या प्रमाणात घट

‘विकार, इजा आणि धोकादायक घटकांचे जागतिक ओझे’ या नावाने जागतिक बँकेने हा अहवाल प्रकाशित केला आहे.

दैनंदिन जीवनात जखमा वा इजा होणे हे नित्याचेच आहे. कापणे, भाजणे, घसरून पडणे, हाणामारी, अपघात आदी प्रकारांमुळे इजा होतात. मात्र इजा होण्याच्या प्रमाणात आता बऱ्यापैकी घट झाली आहे, असे ‘जागतिक बँके’चे म्हणणे आहे. १९९० नंतर इजा होण्याच्या प्रमाणात तिपटीने घट झाली आहे, असे या बँकेने प्रकाशित केलेला अहवाल सांगतो.

‘विकार, इजा आणि धोकादायक घटकांचे जागतिक ओझे’ या नावाने जागतिक बँकेने हा अहवाल प्रकाशित केला आहे. इजांचे प्रमाण घटल्याने जग सध्या सुरक्षित आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
हा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी जगातील १८८ देशांचा अभ्यास करण्यात आला. २०१३च्या आकडेवारीनुसार इजा होण्याची २६ कारणे असून त्याचे ४७ प्रकार आहेत. इजा होण्याची आकडेवारी, इजा होऊन झालेला मृत्यू आणि इजा झाल्याने आलेले अपंगत्व याची सविस्तर माहिती या अहवालात आहे.
२०१३ मध्ये ९७ कोटी ३० लाख जण विविध कारणांमुळे जखमी झाले. त्यापैकी १० टक्के जणांनाच पुरेसे वैद्यकीय उपचार मिळाले. सर्वाधिक म्हणजे २९ टक्के लोक कार अपघातांमुळे जखमी झाले. आत्महत्यांमुळे १७.६ टक्के, घसरून पडल्याने ११.६ टक्के, हिंसाचारामुळे ८.६ टक्के जणांना इजा झाल्या.
इजा झालेल्यांना तात्काळ उपचार मिळत नाहीत. रुग्णालयांमध्येही त्यांना लगेच प्रवेश मिळत नाही, असे हा अहवाल सांगतो. जखमी झालेल्या एकूण रुग्णांपैकी सहा टक्के जणांनाच रुग्णालयात तात्काळ प्रवेश मिळाला. त्यातील ३८.५० टक्के जण अस्थिभंग झालेले रुग्ण होते. जखमी झालेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. जगभरातील ५० लाख लोकांचा इजा झाल्याने मृत्यू झाला, अशी या अहवालातील आकडेवारी सांगते.

’ १५ ते ४९ वयोगटांतील बहुतेक जण रस्ते अपघातात जखमी होतात. आशिया-प्रशांत क्षेत्रात हे प्रमाण कमी आहे. मात्र सब सहारा आफ्रिकेत हे प्रमाण अधिक आहे.
’ युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया प्रशांत क्षेत्रांपेक्षा उत्तर अमेरिकेत अधिक लोक जखमी होतात.

First Published on December 13, 2015 5:28 am

Web Title: reduction of injury
टॅग Injury,World Bank
Just Now!
X