नियमित व्यायाम केल्याने गुडघेदुखी रोखणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. यासाठी ऑनलाइन मिळणाऱ्या व्यायाम पद्धतीही उपयोगी ठरतील, असे संशोधकांनी म्हटले आहे.
खालावलेली जीवनपद्धती आणि खालावलेले मानसिक आरोग्य यांमुळे गुडघेदुखीचा आजार अधिकच गंभीर बनतो. वाढणारे वय, लठ्ठपणा आणि पायाच्या पेशींवर वाढत जाणारा ताण त्यामुळे गुडघेदुखीवर उपचार करणेही कठीण होत जाते.
इंटरनेटच्या माध्यमातून गुडघेदुखीवर प्रभावी उपाय ठरेल असे कार्यक्रम उपलब्ध असून त्यामाध्यमातून गुडघेदुखीवर प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील गुडघेदुखी असलेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १४८ नागरिकांचा अभ्यास केला.
या सर्वाकडून आठ सत्रांमध्ये गुडघ्यांचे विविध व्यायाम करवून घेण्यात आले. इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या व्यायामांचाही या संशोधनात समावेश करण्यात आला. यावेळी चिकित्सकाकडून घेण्यात आलेल्या या व्यायामांमुळे गुडघेदुखी कमी झाल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले. तीन ते नऊ महिने अशाप्रकारे व्यायाम केल्यामुळे गुडघेदुखी रोखण्यात यश येते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 2:12 am