आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त आणि भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. केवळ 10 रुपयांच्या या  IUC टॉपअप प्लॅनमध्ये ग्राहकांना 124 कॉलिंग मिनिट्स मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर दर 10 रुपयांच्या रिचार्जमध्ये तब्बल एक जीबी डेटाही वापरायला मिळेल.

रिलायंस जिओने गेल्या वर्षी आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक बदल केले. कंपनीने प्लॅनचे दर वाढवले, तसेच अन्य नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगही बंद केली आणि IUC चार्ज आकारण्यास सुरुवात केली. तेव्हापासून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारले जातात. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर ग्राहकांना टॉप अप रिचार्ज करावा लागतो. अशा ग्राहकांसाठी जिओने हा 10 रुपयांचा खास टॉप-अप रिचार्ज प्लॅन आणला आहे.

आणखी वाचा – दररोज 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग, व्होडाफोनने आणले दोन नवे प्लॅन

जिओचा सर्वात स्वस्त टॉप-अप प्लॅन 10 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना 124 IUC मिनिट्स मिळतात. जिओ प्रत्येक 10 रुपयांच्या टॉप-अपमध्ये एक जीबी डेटाही मोफत देत आहे. त्यामुळे अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ग्राहक जेवढ्या वेळेस 10 रुपयांचा टॉप-अप करणार तितक्या वेळेस एक जीबी डेटा मोफत मिळेल. याशिवाय जिओचे 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांचे टॉप-अप व्हाउचर देखील आहेत. यामध्ये अनुक्रमे 124, 249, 656, एक हजार 362, सात हजार 12 आणि चौदा हजार 74 मिनिट अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी मिळतात. 20 रुपयांमध्ये 2 जीबी, 50 रुपयांत 5 जीबी, 100 रुपयांत 10 जीबी, 500 रुपयांत 50 जीबी आणि 1000 रुपयांत 100 जीबी डेटाही मोफत मिळतो.