दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने अलिकडेच आपली वेबसाइट अपडेट केली आहे. यासोबतच कंपनीने सर्वाधिक मागणी असलेल्या प्रिपेड रिचार्ज प्लॅन्सचीही विविध श्रेणीत विभागणी केली आहे. कंपनीने सुपर व्हॅल्यू, बेस्ट सेलर्स आणि ट्रेंडिंग अशा तीन श्रेणींमध्ये प्लॅन्सची विभागणी केली आहे. सुपर व्हॅल्यु कॅटेगरीमध्ये तीन, बेस्ट सेलरमध्ये दोन आणि ट्रेंडिगमध्ये एका रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. आज आपण जिओच्या 249 रुपयांच्या सुपर व्हॅल्यू रिचार्ज पॅकबाबत जाणून घेणार आहोत…

249 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लॅन :
रिलायन्स जिओच्या 249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे या प्लॅनमध्ये एकूण 56 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा वापरण्याची दिवसाची मर्यादा संपल्यावर स्पीड कमी होऊन 64Kbps इतका होतो. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळते. याशिवाय दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओन्यूज़, जिओसिक्युरिटी आणि जिओक्लाउडची सेवाही मोफत वापरायला मिळते.

याशिवाय जिओकडे 2,599 रुपयांचाही एक सुपर व्हॅल्यू प्लॅन आहे. 365 दिवस अर्थात एक वर्ष वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये एकूण 740GB हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो.