21 January 2021

News Flash

Jio चा भन्नाट प्लॅन, दररोज 3GB डेटासह मिळतील अनेक फ्री ऑफर्सही

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन प्लॅन्स आणत असते...

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन प्लॅन्स आणत असते. सध्या कंपनीकडे जास्त डेटाची सुविधा देणारे अनेक प्लॅन्स आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत, ज्यामध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो, शिवाय 6GB अतिरिक्त डेटाही मिळतो.

जिओचा 401 रुपयांचा प्लॅन :-
रिलायन्स जिओच्या 401 रुपयांच्या रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय 6 जीबी अतिरिक्त डेटाही या रिचार्ज पॅकमध्ये मिळेल. दररोज मिळणारी डेटा मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64Kbps इतका असतो, म्हणजे एकूण 90GB हाय-स्पीड डेटा या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहक वापरु शकतात.

अन्य ऑफर्स :-
401 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते. तर, अन्य नंबरवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. याशिवाय युजर्सना जिओ अ‍ॅप्सची फ्री मेंबरशिपही मिळते. तसंच, या प्लॅनअंतर्गत युजर्सना Disney+ Hotstar VIP चं एका वर्षाचं मोफत सब्सक्रिप्शनही दिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 4:25 pm

Web Title: reliance jio 401 rupees prepaid plan offers 3gb daily data and unlimited calls check details sas 89
Next Stories
1 5000mAh बॅटरीचा Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती ?
2 आता भारतातच बनणार मोबाइल पार्ट्स, TATA ग्रुप ‘या’ शहरात उभारणार मोठा प्लांट?
3 मेड इन इंडिया FAU-G गेम कधी होणार लाँच? लेटेस्ट रिपोर्टमधून झाला खुलासा!
Just Now!
X