03 June 2020

News Flash

दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा फायदा; Jio, Airtel ची भन्नाट ऑफर

यावर मोठा फायदा मिळणार आहे.

देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं लोकांना अतिरिक्त कमिशन मिळवण्याची एक संधी दिली आहे. यामध्ये युझर्सला त्वरित कॅशबॅक मिळणार आहे. जे दुसऱ्यांचं रिचार्ज करतील त्यांना त्यांना त्वरित कॅशबॅक देण्यात येणार आहे. प्रत्येक यशस्वी रिचार्जवर ही ऑफर लागू असणार आहे.

एअरटेल थँक्स अॅपवर सुपर हिरो फिचरची सुरूवात केल्याची माहिती एअरटेलनं गुरूवारी दिली. याद्वारे ग्राहक सुपर हिरो म्हणून आपलं नाव नोंदवू शकतात. नोंदणी नंतर ग्राहकांना कोणत्याही अन्य एअरटेल क्रमांकाचं रिचार्ज करून देता येईल आणि प्रत्येक रिचार्जमागे कंपनीकडून कॅशबॅकही मिळेल. अशा प्रकारे जिओनंही JioPOS लाइट अॅपची सुरूवात केली आहे. याद्वारे जिओ युझर्स त्यांचे पार्टनर बनू शकतात. तसंच प्रत्येक रिचार्जमागे त्यांना अतिरिक्त क्रेडिटही देण्यात येईल.

एअरटेल सुपरहिरोकडून फायदा
एअरटेलनं नुकताच यासंदर्भातील एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात एअरटेल थँक्स अॅपवर देण्यात आलेल्या सुपरहिरो फिचरबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच या स्कीमबद्दलही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. जर एखाद्या ग्राहकानं दुसऱ्याचा मोबाइल क्रमांक रिचार्च केला तर कापली जाणारी रक्कम ही एमआरपीपेक्षा चार टक्के कमी असेल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच रिचार्च करणाऱ्याला प्रत्येक रिचार्जवर चार टक्क्यांचा फायदा होईल. ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ज, यूपीआय, नेट बँकिंग, एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम आणि अॅमेझॉन पे द्वारे भरता येऊ शकते.

जिओ पार्टनर बनून मिळवा फायदा
एअरटेलप्रमाणेच जिओनंही JioPOS लाइट हे अॅप सुरू केलं आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती जिओ पार्टनर बनू शकते. या अॅपवर सर्वप्रथम साईन इन करावं लागतं. त्यानंतर वॉलेटमध्ये टाकलेल्या पैशांद्वारे जिओ युझर्सचा मोबाईल रिचार्ज करू शकता. यात रोजची कमाई एका स्क्रीनवर पाहू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 9:50 pm

Web Title: reliance jio airtel new offers you will get cashback when you recharge others mobile number jud 87
Next Stories
1 आयुर्वेद : चेहऱ्यावर पिंपल्स आहेत का? करा हे घरगुती उपाय
2 लॉकडाउनमध्ये ” ड ” जीवनसत्व कसे वाढवाल
3 Facebook ने फक्त ‘कपल्स’साठी लाँच केलं नवीन चॅटिंग App
Just Now!
X