आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपला 4,999 रुपयांचा ‘लाँग टर्म प्लॅन’ पुन्हा उपलब्ध केला आहे. हा प्लॅन कंपनीने डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ दरवाढीनंतर अचानक बंद केला होता. या प्लॅनसोबतच रिलायंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये आता तीन लाँग टर्म प्लॅन झाले आहेत. 4,999 रुपयांशिवाय 1,299 रुपये आणि 2,121 रुपयांचे अन्य दोन प्लॅन आहेत. तर जाणून घेऊया 4,999 रुपयांच्या लाँग टर्म प्लॅनमध्ये तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतील…

4,999 रुपयांचा प्लॅन :-
360 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय 350 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 12 हजार मिनिट मिळतात. याशिवाय दररोज 100 फ्री एसएमएस आणि फ्री जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

रिलायंस जिओच्या 2,121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवस वैधता आणि दररोज 1.5जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 12 हजार मिनिट मिळतील. तसेच या प्लॅनमध्ये दररोज100 फ्री एसएमएसची सुविधाही मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्येही जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

तर, जिओच्या 1,299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 फ्री एसएमएससोबत 24जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. 336 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा आहे. अन्य लाँग टर्म प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्येही अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 12 हजार फ्री कॉलिंग मिनिट आणि जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.