मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओ फोन ३, जिओ सेटटॉप बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

रिलायन्स फायबरमध्ये एक जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे. सगळे व्हॉइस कॉल्स फ्री, अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल अमेरिका व कॅनडा ५०० रुपये प्रति महिना. जिओ फायबरमध्ये बहुतेक सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहेत. अमेरिकेत ९० एमबीपीएस स्पीड आहे. जिओचा स्पीड १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएसपर्यंत आहे. जगातील सगळ्यात बेस्ट ब्राँडबँड असल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. जागतिक बाजाराच्या तुलनेत एक दशांश किमतीत सेवा उपलब्ध आहे.

सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना अंबानी म्हणाले, गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु होती. पाच लाख घरांमध्ये सध्या या सेवेचा वापर केला जात आहे. १०० जीबी पेक्षा जास्त डेटा यामध्ये वापरला जात आहे. यासोबत लँडलाइन सेवाही मिळणार आहे. जिओ फायबरमुळे तुम्हाला अफाट ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत.

जिओ फायबरची वैशिष्ट्ये?

– ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात
– यामध्ये केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे
– ज्या दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार त्याच दिवशी पाहता येणार. जून २०२० नंतर ही सेवा सुरूवात होणार.
– एक अब्ज घरांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) ने कनेक्ट करण्याचं रिलायन्सचं लक्ष्य
– जिओ भारतातील पहिली तर जगातली दुसरी मोठी टेलिकॉम ऑपरेटर सेवा
– अनेक स्मार्ट होम सुविधा