05 March 2021

News Flash

रिलायन्स जिओच्या ‘या’ मोबाईल रिचार्जवर होणार चौपट फायदा

१ जूनपासून ही ऑफर सुरू झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात तर तुम्हाला जून महिन्यात मोबाईल रिचार्जवर अतिरिक्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. २४९ किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचं रिचार्ज केल्यानंतर कंपनी त्यावर चौपट बेनिफिट्स देत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना AJIO, Trends, Trends फुटवेअर आणि रिलायन्स डिजिटलचे कुपन देण्यात येणार आहे. रिचार्ज केल्यानंतर हे कूपन माय जिओ अॅपमध्ये क्रेडिट करण्यात येतील. जे जिओचे अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे. तसंच यासाठी जिओची प्राईम मेंबरशीपही असणं अनिवार्य आहे. १ जूनपासून ही ऑफर लागू करण्यात आली आहे.

२४९ रूपये, ३४९, ३९९, ४४४, ५५५, ५९९, १२९९, २१२१, २३९९ आणि ४९९९ रूपयांच्या रिचार्जवर ही ऑफर मिळणार आहे. पार्टनर कूपन्स ग्राहकांच्या माय जिओ अॅपमध्ये क्रेडिट करण्यात येतील. तसंच रिचार्ज केल्यानंतर ७२ तासांच्या आत ही कूपन्स क्रेडिट केली जातील. जर एखाद्या ग्राहकाला एकापेक्षा अधिक कूपन मिळाली तर असं एक कूपन दर महिन्याला ग्राहकांना देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक कूपनची वैधता ३० दिवसांच्या आत संपणार आहे.

काय आहे फायदा?

२४९ रूपयांचं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकाला AJIO, Trends, Trends फुटवेअरचं ३०० रूपयांचं कूपन देण्यात येणार आहे. तसंच रिलायन्स डिजिटलचं २४९ रूपयांचं कूपन मिळणार आहे.

३४९ रूपयांचं रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना AJIO, Trends, Trends फुटवेअरचे ३०० रूपयांची दोन तर रिलायन्स डिजिटलचं ३४९ रूपयांचं एक कूपन मिळेल.

ग्राहकानं जर ३९९ रूपयांच रिचार्ज केलं तर त्याला AJIO, Trends, Trends फुटवेअरचं ३०० रूपयांची दोन आणि रिलायन्स डिजिटलचं ३९९ रूपयांचं एक कूपन देण्यात येईल.

४४४ रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना AJIO, Trends, Trends फुटवेअरची ३०० रूपयांची दोन तर ४४४ रूपयांचं एक कूपन मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 9:28 pm

Web Title: reliance jio four times benefits from recharges above 249 ajio reliance trends reliance footwear digial jud 87
Next Stories
1 Xiaomi ची आता लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, 11 जूनला लाँच होणार Mi Notebook
2 Poco च्या शानदार स्मार्टफोनच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवीन किंमत
3 भाजल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा…
Just Now!
X