News Flash

Reliance Jio युजर्ससाठी ‘गुड न्यूज’, आता ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार जास्त 4G डेटा

Jio च्या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार जास्त 4G डेटा

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे आपल्या प्रिपेड युजर्ससाठी अनेक निरनिराळ्या किंमतीचे प्लॅन्स आहेत. शिवाय कंपनीकडे स्वस्त 4जी डेटा व्हाउचर्सही आहेत. ग्राहकांना जास्त फायदा देण्यासाठी कंपनी वेळोवेळी आपल्या जुन्या प्लॅन्सना अपडेट करत असते. अलिकडेच जिओने आपल्या 11 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 4जी ‘डेटा अ‍ॅड-ऑन’ व्हाउचरमध्ये काही मोठे बदल केले आहेत.

Reliance Jio च्या 11 रुपयांच्या ‘डेटा अ‍ॅड-ऑन’ व्हाउचरमध्ये युजर्सना आता आधीपेक्षा जास्त डेटा वापरण्यास मिळेल. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरही अपडेट करण्यात आला आहे. जिओच्या 11 रुपयांच्या व्हाउचरमध्ये आतापर्यंत प्रिपेड युजर्सना 800 एमबी डेटा मिळत होता. पण आता या व्हाउचरद्वारे युजर्सना 1GB डेटा वापरण्यास मिळेल. 1GB डेटामर्यादा संपल्यानंतरही कमी स्पीडसह (64Kbps) डेटा वापरता येईल. या व्हाउचरसोबत कोणतीही वैधता मिळणार नाही, कारण हा फक्त डेटा व्हाउचर आहे. त्यामुळे तुमच्या सध्या अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्लॅनइतकीच याची व्हॅलिडिटी असेल.

11 रुपयांशिवाय रिलायन्स जिओकडे 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे काही स्वस्त 4जी डेटा व्हाउचर्सही उपलब्ध आहेत. यामध्ये युजर्सना अनुक्रमे 2 जीबी, 6 जीबी आणि 12 जीबी डेटा मिळतो. हे देखील फक्त डेटा व्हाउचर प्लॅन आहेत, त्यामुळे अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळत नाही. याशिवाय कंपनीकडे तीन डेटा प्लॅन्सही आहेत. 151 रुपये, 201 रुपये आणि 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनुक्रमे 30 जीबी डेटा, 40 जीबी डेटा आणि 50 जीबी डेटा मिळतो. या तिन्ही Jio Data Plans ची व्हॅलिडिटी 30 दिवस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 3:34 pm

Web Title: reliance jio has revised its budget rs 11 data add on plan now offering1gb data sas 89
Next Stories
1 मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका; सर्व कारच्या किंमती वाढल्या
2 Tesla चे सीईओ एलन मस्क देणार तब्बल 730 कोटी रुपये बक्षीस, फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3 लाँचिंगआधीच जबरदस्त ‘हिट’ ठरतोय ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम, प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा 40 लाखांपार
Just Now!
X