‘JioPhone 2’ खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, रिलायन्स जिओने जन्माष्टमीनिमित्त एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, केवळ 141 रुपयांच्या ईएमआयवर ‘JioPhone 2’ खरेदी करता येणार आहे.

कंपनीचा ‘JioPhone 2’ हा फीचर फोन 2018 मध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 2,999 रुपये आहे. पण, ऑफरनुसार हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन दरमहा 141 रुपयांच्या ईएमआयद्वारे विकत घेता येणार आहे.

Qwerty की-पॅड, यू ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अ‍ॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे आहे.

फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.