03 March 2021

News Flash

jiofi जिओफाय मिळणार केवळ ९** रुपयांत

इंटरनेटची अनोखी सुविधा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मागील काही दिवसांपासून धमाकेदार ऑफर्स देऊन अक्षरशः वेड लावले आहे. काही दिवसातच कंपनीने आपला मोबाईल फोनही बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचं बुकींगही सुरु झालं. कंपनीच्या मोबाईल मार्केटमधील आक्रमक पवित्र्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले. यामुळे त्यांनी नवीन मोबाईलची मॉडेल लाँच करण्याच्या घोषणा केल्याच पण जिओच्या कार्डमुळे इतर कंपन्यांनीही आपले स्वस्तातील प्लॅन्स घोषित करण्यास सुरुवात केली. ग्राहकांसाठी आणखी एक खूषखबर म्हणजे जिओने आपल्या वायफाय सेवेवर तब्बल १ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे.

नवरात्रीसाठी सॅमसंगच्या धमाकेदार ऑफर्स

१९९९ रुपयांचे जिओफाय jiofi आता केवळ ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीने आपली ही ऑफर जाहीर केली असून ग्राहकांना त्याचा लाभ २० ते ३० सप्टेंबर या कालावधीतच घेता येणार आहे. या १० दिवसांदरम्यान जर तुम्ही जिओफायचे कनेक्शन घेतलेत तर तुम्हाला केवळ ९९९ रुपये भरावे लागतील असे जिओकडून सांगण्यात आले आहे. ही कनेक्शन आपण कंपनीच्या वेबसाईटवर तसेच रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहे.

क्रेडिट कार्डच्या व्यवहारात अडचणी येताहेत? ही कारणे असू शकतात…

जिओने आपली इंटरनेटची वायफाय सुविधा लाँच केली तेव्हा त्याची किंमत २३२९ रुपये इतकी होती. त्यानंतर काही काळात ही किंमत कमी करण्यात येऊन १९९९ इतकी करण्यात आली. आता पुन्हा एकदा सणांच्या मुहूर्तावर किंमत कमी करुन जिओने आपल्या ग्राहकांना खूश केले आहे. तुम्ही हे वायफाय डिव्हाईस खरेदी केले तर तुम्हाला जिओचे कार्ड खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय जिओच्या सिमकार्डच्या बरोबरच डेटाप्लॅनही घ्यावा लागणार आहे. यासाठी जिओकडून विविध इंटरनेट प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 12:52 pm

Web Title: reliance jio jiofi gets discount now available at rs 999 only
Next Stories
1 Navratri Recipes : उपवासाचा पायनॅपल राइस
2 सर्व लशी एकाच टोचणीत देण्याचे तंत्रज्ञान विकसित
3 फेकून देऊ नका, कारण खूप उपयोगी आहे ‘ही’ छोटीशी पुडी
Just Now!
X