News Flash

रिलायन्स जिओच्या लँडलाईन सेवेला सुरूवात

ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.

संग्रहित

रिलायन्स जिओची वार्षिक सर्वसाधार सभा नुकतीच पार पडली. यादरम्यान, कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अनेक घोषणा केल्या. आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी लँडलाईन सेवेचीही सुरूवात करण्यात आली आहे. रिलायन्स जिओची गिगा फायबर ही सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना या लँडलाईन सेवेचा वापर करता येणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. सध्या गिगा फायबर सेवेशी जवळपास पाच लाख ग्राहक जोडले गेले आहेत. तसेच कंपनी सध्या ट्रायल बेसिसवर ग्राहकांना ही सेवा पुरवत असून ५ सप्टेंबर रोजी ही सेवा सर्वांसाठी सुरू केली जाणार आहे. कंपनी गिगा फायबरद्वारे हायस्पीड इंटरनेट, लँडलाईन आणि केबल टिव्हीसारख्या सेवा पुरवणार आहे.

रिलान्सच्या जिओचे देशभरात ३४ कोटी मोबाइल ग्राहक आहेत. समूहाने सुरुवातीच्या टप्प्यात मोफत मोबाइल कॉल व इंटरनेटस असलेली ही सेवा सर्वप्रथम तीन वर्षांपूर्वी गणपतीच्या हंगामातच सुरू केली होती. कंपनीने मोबाइल ग्राहक संख्येतील अव्वलतेबाबत सुरुवातीला भारती एअरटेल व नंतर व्होडाफोन आयडियालाही मागे टाकले. समूहाने ४जी तंत्रज्ञानाकरिता ३.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

समूहाची बहुप्रतिक्षित फायबरवर आधारित फिक्स्ड लाईन ब्रॉडबँण्ड सेवा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. जिओ फायबरद्वारे लँडलाईनवरून देशभरात कुठेही केले जाणारे कॉल आजीवन निशुल्क असतील. नव्या क्लाऊड डाटा केंद्रासाठी मायक्रोसॉफ्टसह भागीदारी आहे. जिओ फायबर अंतर्गतच नवीन उत्पादनाद्वारे इंटरनेट वेग किमान १०० ते कमाल १,००० एमबीपीएस असेल. त्याचे दर ७०० ते १०,००० रुपये असतील. शिवाय एचडी किंवा ४के एलईडी टिव्ही आणि ४के सेट टॉप बॉक्सची जोड देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:49 pm

Web Title: reliance jio landline service started tv service will start soon jud 87
Next Stories
1 Realme च्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा सेल; 1,500 रुपये कॅशबॅक व 5,300 रुपयांपर्यंत फायदा
2 Realme Days Sale : स्वस्तात मिळतायेत Realme स्मार्टफोन्स, जाणून घ्या ऑफर्स
3 अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय?
Just Now!
X