देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणलेली एक स्वस्त ऑफर बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने New Year 2020 ही ऑफर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ही ऑफर जिओने वर्षाच्या वर्षाच्या सुरूवातीला आणली होती. पण, त्यासोबतच कंपनीने आता एक नवीन प्लॅन आणला आहे.

जिओच्या New Year 2020 ऑफरमध्ये युजर्सना 365 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, 1.5 जीबी प्रतिदिन डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळत होते. आता कंपनीने ही ऑफर बंद केली आहे. पण, त्याबदल्यात 2,121 रुपयांचा नवा प्लॅन कंपनीने आणला आहे. या नव्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधा आधीच्या New Year 2020 प्लॅन प्रमाणेच आहेत. पण या प्लॅनची वैधता 365 दिवसांवरुन 336 दिवस करण्यात आली आहे.

या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 504 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळेल. म्हणजे दररोज 1.5 जीबी डेटा, जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, मोफत एसएमएस आणि फ्री जिओ अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतील. तर, अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी एकूण 12,000 मिनिटं मिळतील. एअरटेलच्या 2, 398 रुपये आणि व्होडाफोनच्या 2,399 रुपयांच्या प्लॅन्सना टक्कर देण्यासाठी जिओने हा नवा प्लॅन आणला आहे.

आणखी वाचा – (टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)