News Flash

Jio चा धमाका, नवीन ‘वर्क फ्रॉम होम प्लॅन’ लॉन्च

वर्क फ्रॉम होम आणि अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन...

संग्रहित छायाचित्र

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स आणले आहेत. जिओने ‘NEW WORK FROM HOME PLANS’ लॉन्च केले आहेत. लॉकडाउनमुळे देशभरात अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यामुळे जास्त डेटा असणाऱ्या प्लॅन्सची मागणी वाढलीये. अशात जिओने ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीत जास्त डेटा देणारे प्लॅन्स लॉन्च केले आहेत. जाणून घेऊया Jio च्या नवीन वर्क फ्रॉम होम प्लॅन्सबाबत.

रिलायन्स जिओने 365 दिवस अर्थात एका वर्षाची व्हॅलिडिटी असलेला 2,399 रुपयांचा एक प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा(एकूण 730 GB डेटा) मिळेल. म्हणजे जवळपास महिन्याला 200 रुपये खर्च करुन ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचाही फायदा मिळेल. हा प्लॅन वर्क फ्रॉम होम आणि अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन ठरु शकतो. प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे असलेल्या वार्षिक प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनमध्ये 33 टक्के अधिक फायदा मिळतो, असा दावा जिओने केलाय.

कंपनीकडे आधीपासूनच 2,121 रुपयांचा एक वार्षिक प्लॅन आहे. यामध्ये 336 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. याशिवाय जिओने 151 , 201 आणि 251 रुपयांचे तीन डेटा अ‍ॅड ऑन पॅक आणले आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये अनुक्रमे 30 जीबी , 40 जीबी आणि 50 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे यामध्ये दिवसाची डेटा मर्यादा नाहीये. हे तिन्ही प्लॅन केवळ डेटा ओन्ली प्लॅन आहेत. त्यामुळे यामध्ये ग्राहकांना व्हॅलिडिटी मिळत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 8:12 am

Web Title: reliance jio launches new work from home recharge plans rs 2399 annual data plan know all details sas 89
Next Stories
1 …तर Nissan ने बंद केली ‘ही’ SUV ? वेबसाइटवरुन हटवली गाडी
2 Mi 10 5G भारतात झाला लॉन्च, 5G कनेक्टिव्हिटीसह मिळेल तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा
3 ‘या’ भारतीय App ची धमाल, काही दिवसांमध्येच कोट्यवधी लोकांनी केलं डाउनलोड
Just Now!
X