30 टक्के मार्केट शेअर मिळवून रिलायंस जिओफोन भारतातील अव्वल फीचर फोन ठरला आहे. काउंटरप्वाइंट रिसर्चच्या एका अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतातील 400 मिलियन फीचर फोन वापरकर्त्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असंही काउंटरप्वाइंटच्या ‘इंडिया स्मार्टफोन मार्केट शेअर Q1 2019’ च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग –
रिलायंस जिओनंतर फीचर फोनच्या मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग कंपनी आहे. 15 टक्के इतका सॅमसंगचा मार्केट शेअर असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तर, या बाबतीत लावा कंपनी तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के इतका त्यांचा मार्केट शेअर आहे.

भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात 2018 नंतर पहिल्यांदाच प्रतिसाद कमी झाल्याचं या पाहणीत समोर आलं आहे पण फीचर फोनच्या मार्केटमध्ये सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

1,184 मिलियन मोबाइल सब्सक्राइबर्स –
CLSA ने आपल्या इंडिया टेलिकॉम रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये मोबाइल सबस्क्राइबर्सची संख्या 2 मिलियनने वाढून 1 हजार 184 मिलियन झाली आहे. यापैकी एकट्या जिओने 80 लाख नवे सबस्क्राइबर्स जोडले आहेत. परिणामी भारतात 30.6 कोटी इतका जिओचा ग्राहकवर्ग झाला आहे.