नवनव्या ऑफर्स आणि ४ जी सेवांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ या कंपनीनं अवघ्या काही वर्षातच बाजारावर आपलं अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली. रिलायन्स जिओच्या बाजारातील पदार्पणानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या पॅकचे दर कमी केले होते. जिओनं काही दिवसांपूर्वी २५१ रूपयांचा एक प्लॅन बाजारात आणला होता. पण कंपनीनं आता त्या प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत.
रिलायन्स जिओनं आपल्या २५१ रूपयांच्या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. २५१ रूपयांचं रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना यापूर्वी दररोज २ जीबी डेटा मिळत होता. पण आता कंपनीनं तो प्लॅन नव्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट केला आहे. तर दुसरीकडे केवळ कॅटेगरीच नाही तर या पॅकसोबत देण्यात येणारे बेनिफिट्सदेखील कंपनीनं बदलले आहेत.
यापूर्वी २५१ रूपयांचा हा पॅक ४ जी डेटा व्हाऊचरमध्ये उपलब्ध होता. तसंच यासोबत दररोज २ जीबीचा डेटा देण्यात येत होता. तसंच या प्लॅनची व्हॅलिडिटीही ५१ दिवसांची होती. डेटा लिमिट संपल्यानंतर युझर्स अॅक्टिव्ह प्लॅन व्यतिरिक्त हे डेटा व्हाऊचर खरेदी करून अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकत होते. परंतु यात एसएमएस किंवा कॉलिंगची सुविधा देण्यात येत नव्हती. परंतु आता कंपनीनं हा पॅक वर्क फ्रॉम होम या कॅटेगरीत सामिल केला आहे. तसंच यासोबत आता केवळ ५० जीबी ४ जी डेटा देण्यात येणार आहे. यापूर्वी या पॅकसोबत १०२ जीबी ४ जी डेटा देण्यात येत होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 3:30 pm