X

Jio चा धमाका! १,९९९ रुपयांत फोनसह २ वर्षांसाठी अनलिमिटेड डेटा!

रिलायन्स जिओने ३ नव्या ऑफर लाँच केल्या असून यामध्ये जिओच्या विद्यमान ग्राहकांसोबतच नव्या ग्राहकांसाठी देखील ऑफरचा समावेश आहे.

आपल्या अत्यल्प दरांच्या प्लॅन्समुळे मोबाईल टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट मार्केटचा चेहरा-मोहरा बदलून टाकणाऱ्या JIO ने आता एक नवीन धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमधून ग्राहकांना तब्बल २ वर्षांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज २ जीबी हाय स्पीड डेटाचा वापर करता येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी रिलायन्सकडून प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा करण्यात आली आहे. जिओच्या या नव्या घोषणेमुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली असून जिओ आणि नॉन जिओ अशा दोन्ही ग्राहकांसाठी जिओने प्लॅन्सची घोषणा केली आहे.

१९९९ रुपयांत…

अशा प्रकारची ऑफर भारतात तरी पहिल्यांदाच लाँच होत असल्याचं जिओनं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. यामध्ये १९९९ रुपयांमध्ये नवा जिओ फोन, त्यासोबत २ वर्षांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि २ वर्षांसाठी दर महिन्याला २ जीबी डेटा म्हणजेच एकूण ४८ जीबी डेटा मिळणार आहे! सोबतच पूर्ण २ वर्ष कोणतंही रिचार्ज करण्याची गरज नसेल.

१४९९ रुपयांत…

ज्या ग्राहकांना १९९९ रुपयांचा प्लॅन घ्यायचा नसेल, त्यांच्यासाठी जिओचा १४९९ रुपयांचा प्लॅन देखील असून यामध्ये नवा जिओ फोन, १ वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १ वर्षासाठी दर महिन्याला २ जीबी हाय स्पीड डेटा म्हणजेच २४ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वर्षभर कोणतंही रिचार्ज करावं लागणार नाही.

७४९ रुपयांत…

याशिवाय, सध्या जिओ वापरणाऱ्या ग्राहकांसाठी देखील नवीन ऑफर जिओने लाँच केली आहे. यामध्ये ७४९ रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, वर्षभरासाठी दर महिन्याला २ जीबी हाय स्पीड डेटा आणि वर्षभर कोणत्याही रिचार्जची गरज नाही.

येत्या १ मार्चपासून नवे प्लॅन्स आणि नव्या ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असं रिलायन्सकडून जाहीर करण्यात आलं आहे.

24
READ IN APP
X