26 February 2021

News Flash

Jio ने आणली नवीन रिचार्ज ऑफर, 28 फेब्रुवारीपर्यंत घेता येईल लाभ

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणली नवीन रिचार्ज ऑफर

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज ऑफर आणली आहे. 16 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या ऑफरचा फायदा युजर्सना 28 फेब्रुवारीपर्यंत घेता येईल. या ऑफरअंतर्गत रिचार्ज केल्यावर कॅशबॅक आणि रिवॉर्ड यांसारख्या ऑफर्स आहेत. ऑफरनुसार, जिओच्या रिचार्जवर 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 1,000 रुपयांपर्यंत रिवॉर्ड मिळू शकेल. सविस्तर जाणून घेऊया या शानदार ऑफरबाबत…

Paytm वरुन रिचार्ज केल्यास ऑफर :-
नवीन ऑफऱअंतर्गत जर तुम्ही Paytm द्वारे जिओ नंबरवर रिचार्ज केल्यास 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जवर मिळेल, तर जुन्या ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत रिवॉर्ड मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी किमान 48 रुपयांचं रिचार्ज करणं आवश्यक आहे. रिवॉर्ड म्हणून काही कुपन मिळतील, त्यांचा वापर शॉपिंगसाठी वगैरे करता येतो.

PhonePe रिचार्ज ऑफर :-
जर तुम्ही PhonePe रिचार्ज करणार असाल तर तुम्हाला 140 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल आणि सोबत 260 रुपयांपर्यंत स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड मिळेल. तर, जुन्या ग्राहकांना पहिल्या रिचार्जवर 120 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. युपीआय आयडीद्वारे रिचार्ज केल्यास ही ऑफर लागू असेल. PhonePe च्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी किमान 125 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल.

Mobikwik रिचार्ज ऑफर :-
Mobikwik द्वारे 149 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे रिचार्ज युपीआयवरुन केल्यास 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. जास्तीत जास्त 50 रुपये कॅशबॅकची ही ऑफर आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी नवीन ग्राहकांना ‘NJIO50’ कोड टाकावा लागेल. तर, जुने ग्राहक ‘JIO50P’ कोड वापरुन 100 रुपये सुपरकॅश जिंकू शकतात.

Freecharge रिचार्ज ऑफर :-
जर तुम्ही नवीन ग्राहक असाल आणि Freecharge द्वारे रिचार्ज केल्यास 30 रुपये कॅशबॅक मिळेल. तर, जुन्या ग्राहकांना 20 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. 30 रुपये कॅशबॅकसाठी कुपन कोड ‘JIO30’ आहे, आणि 20 रुपये कॅशबॅकसाठी कुपन कोड ‘JIO20’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 4:26 pm

Web Title: reliance jio new recharge offer avail up to rs 1000 off through these apps check details sas 89
Next Stories
1 ‘या’ शारीरिक समस्यांनी त्रस्त आहात? मग आहारात करा सीताफळाचा समावेश
2 FB चा मोठा दणका; ऑस्‍ट्रेलियात न्‍यूज सर्व्हिस केली बॅन, स्वतःचं पेजही केलं ब्‍लॉक
3 काय? फोटोत दिसणारी ‘ही’ व्यक्ती पुरुष नाही…मग? ; जाणून घ्या फोटोमागील सत्य
Just Now!
X