News Flash

Jio ने आणली जबरदस्त ऑफर , मिळेल 5 महिने फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगही

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio ने आणली भन्नाट ऑफर

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी नवीन JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट खरेदी करणाऱ्यांना पाच महिन्यांपर्यंत फ्री डेटा आणि अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंगची ऑफर देत आहे. जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त आणलेल्या या ऑफरचा लाभ नवीन JioFi डिव्हाइस खरेदी करणाऱ्यांना होईल.

1,999 रुपये इतकी JioFi ची किंमत आहे. खरेदी केल्यानंतर ग्राहकांना JioFi चा कोणताही प्रीपेड प्लॅनही खरेदी करावा लागेल. ग्राहक ऑनलाइन किंवा रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून JioFi खरेदी करु शकतात. JioFi हॉटस्पॉट खरेदी केल्यानंतर आणि Jio SIM अ‍ॅक्टिव्ह करताना ग्राहकांना तीनपैकी कोणताही एक प्लॅन निवडावा लागेल. JioFi मधील सिम कार्ड सुरू झाल्यानंतर तासाभरात प्लॅनचे बेनिफिट्स मिळतील. MyJio अ‍ॅपवर जाऊन ग्राहक त्यांचं अ‍ॅक्टिवेशन स्टेटस चेक करु शकतात.

JioFi चा  199 रुपयांचा प्लॅन –
कंपनीकडे 199 रुपयांचा JioFi चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. यामध्ये 1.5 जीबी डेटा रोज मिळतो. याशिवाय 28 दिवसांची वैधता आहे. हा प्लॅन घेताना अतिरिक्त 99 रुपयांमध्ये Jio Prime मेंबरशिपचाही लाभ मिळतो. प्राइम मेंबरशिपमुळे 140 दिवसांसाठी प्लॅनमधील लाभ मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटाशिवाय जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि रोज 100 फ्री एसएमएस मिळतात.

249 आणि  349 रुपयांचा प्लॅन –
कंपनीकडे दुसरा 249 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह (अतिरिक्त 99 रुपयांमध्ये Jio Prime मेंबरशिप घेतल्यास 112 दिवस) दररोज 2 जीबी डेटा मिळतो. अन्य बेनिफिट्स 199 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. याशिवाय, तिसरा पर्याय 349 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी (अतिरिक्त 99 रुपयांमध्ये Jio Prime मेंबरशिप घेतल्यास 84दिवस) दररोज 3 जीबी डेटा मिळतो. यामध्येही फ्री कॉलिंग आणि 100 एसएमएस यांसारखे बेनिफिट्स मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 11:16 am

Web Title: reliance jio offers 5 months of free data calls with new jiofi connection check details sas 89
Next Stories
1 दर महिन्याच्या 17 तारखेला मिळणार शानदार ऑफर्स, ‘वनप्लस’ने केली Red Cable Day ची घोषणा
2 सॅमसंगच्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर डिस्काउंट; किंमत फक्त 8,399 रुपये
3 Video : मुलांच्या स्क्रीनटाइमचं मॅनेजमेंट करताना…
Just Now!
X